Friday, July 4, 2025
HomeसांगलीSangli: सांगलीत एक किलो गांजा जप्त; तरुण गजाआड; जादा दराने विक्रीचा प्रयत्न

Sangli: सांगलीत एक किलो गांजा जप्त; तरुण गजाआड; जादा दराने विक्रीचा प्रयत्न

येथील संजयनगर परिसरात जादा दराने गांजा विक्रीसाठी येणाऱ्यास गुन्हे प्रकटीकरण शाखेने गजाआड केले. सलमान कमरूद्दीन मुल्ला (वय ३२, राजीवनगर, जुना कुपवाड रस्ता, संजयनगर) असे त्याचे नावे आहे.त्याच्याकडून २२ हजार रुपयांचा एक किलो शंभर ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

 

पोलिसांनी दिलेली माहिती, अशी की अंमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी कारवाईचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. त्यानुसार संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवार बाजार परिसरात एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकास मिळाली.

 

त्यानुसार छापा टाकून एका संशयित तरुणास गजाआड केले. त्याच्याकडून एक किलो गांजा जप्त करण्यात आला. निरीक्षक सुरज बिजली यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक किरण स्वामी, उपनिरीक्षक ज्योतीबा भोसले, विनोद साळुंखे, कपिल साळुंखे, सुशांत लोंढे, अनिकेत शेटे, सुरज मुजावर यांचा कारवाईत सहभाग होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -