कोरोना व्हायरसनं (Covid-19) राज्यास भारतात (COVID-19 Cases in India) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. पुढे आलेल्या आकडेवारीनुसार देशात रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याचे समोर आले आहे.
यात देशात सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांवर पोहचली असून गेल्या 24 तासांत 203 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर मृतांचा आकडा वाढून 32 वर गेला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात 59 नवीन कोविड-पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात सध्या 494 सक्रिय रुग्ण आहेत. याव्यतिरिक्त, 369 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याचीही माहिती समोर आली आहे.
मुंबईत 20, तर पुण्यात 17 नव्या कोविड रुग्णांची नोंद
मुंबई- 20
ठाणे-4
पुणे-1
पुणे मनपा-17
पिंपरी चिंचवड मनपा -2
सातारा -2
कोल्हापूर, मनपा -2
सांगली मनपा-1
छ. संभाजीनगर -1
छ. संभाजीनगर मनपा- 7
अकोला मनपा- 2
प्रशासनाकडून घाबरून न जाण्याचे आवाहन
कोविड हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. सद्यस्थितीत कोविडसाठी महाराष्ट्रामध्ये ILI(Influenza like Illness) आणि SARI(Severe Acute Respiratory Infection) सर्वेक्षण चालू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये अशा रुग्णांची कोविडसाठी चाचणी केली जाते. सदर कोविड रुग्णांना पॉझीटीव आल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. राज्यात सध्या कोविड केसेस तुरळक आहेत. कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेला आवाहन करण्यात येते कि कोणीही घाबरून जाऊ नये. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राज्यात सक्रीय असलेले रुग्ण 494 वर
– जानेवारी 2025 पासून केलेल्या कोविड चाचणी संख्या 12011 इतकी आहे.
– जानेवारी 2025 पासून पॉझीटीव रुग्ण -873
– आज रोजी पर्यंत 369 रुग्ण बरे झाले आहेत.
– दि.2 जून 2025 रोजी पॉझीटीव रुग्ण 59 इतके आहेत.
आज रोजी सक्रीय असलेले रुग्ण 494
– जानेवारी 2025 पासून मुंबईमधील एकूण रुग्ण संख्या 483
( जानेवारी1, फेब्रुवारी मार्च एप्रिल 4 मे 477)
सर्व निदान झालेले रुग्ण हे सौम्य स्वरुपाचे आहेत.