प्रत्येक वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेटची (एचएसआरपी) लावणे अनिवार्य करण्यात आले असून येत्या 30 जून नंतर किमान ऑनलाईन नाेंदणी केल्याची पावती असल्यास दंडात्मक कारवाईतून सूट दिल्या जाणार आहे.
अन्यथा प्रत्येक वाहनाला प्राथमिक स्वरुपात दाेन हजार रुपयांचा दंड ठाेठावण्यात येणार आहे. त्यानंतरही एचएसआरपीची नाेंदणी नसल्यास दंडाची रक्कम वाढविण्यात येणार आहे.
शहरातील HSRP कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्था अबाधित राखण्यासाठी 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्वच जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवून घेणे परिवहन विभागाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे अनेक वाहनचालक आता ऑनलाईन नाेंदणी करण्यासाठी धावपळ करीत आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाने आता तिसऱ्यांदा मुदत वाढ केली असून 30 जूनपर्यंत प्रत्येक वाहनाधारकाने किमान ऑनलाईन नाेंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा मुदत संपल्यानंतर वाहनचालकांना दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. एचएसआरपी नसल्यास वाहनचालकांकडून दाेन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. परिवहन विभागाकडून 1 जानेवारी पासून सुरवात झालेल्या या प्रक्रियेला आता पाच महिन्यांचा कालावधी हाेत आहे. याकरिता आधी 31 मार्च नंतर 30 एप्रिल आणि आता 30 जून 2025 अशी तीनदा मुदत वाढवून दिली. तरीही एचएसआरपी ऑनलाईन नाेंदणी करण्यास वाहनचालकांचा अल्प प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
25 लाख वाहने अद्याप बाकी
एचएसआरपीची HSRP ऑनलाईन नाेंदणी करण्यासाठी जेमतेम 26 दिवसांचा कालावधी बाकी आहे. शहरात नाेंदणी असलेल्या 26 लाख 93 हजार 375 जुन्या वाहनांपैकी केवळ 1 लाख 30 हजारांवर वाहनांनीच नवीन नंबर प्लेट बदलविली आहे. हे प्रमाण केवळ 20 टक्केच आहे. त्यामुळे येत्या 226 दिवसांत एवढ्या वाहनांची नाेंदणी किंवा नवीन नंबर प्लेट बसविणे अशक्य आहे. त्यामुळे वाहनधारक आणि प्रशासनापुढे पेच पडला आहे.
नागरिकांमध्ये संभ्रम
अनेकांकडील HSRP वाहनांची कागदपत्रे गहाळ झाली किंवा खराब झाली आहेत. तसेच एचएसआरपी ऑनलाईन नाेंदणी करायची असल्यास इंश्युरन्स, पीयूसी आणि आरसी बुक अपडेट करावे लागणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याबाबत परिवहनाने विभागाने काेणतेही स्पष्ट निर्देश दिले नाहीत. शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयात 14 लाख 54 हजार 231 वाहने तर पूर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयात (एमएच-49) 6 लाख 76 हजार 434 वाहनांची नाेंदणी आहे. तर नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात 5 लाख 62 हजार 710 वाहनांची नाेंद आहे. दंडांची रक्कम वाचविण्यासाठी अनेक जण आता वाहनांची कागदपत्रे तयार करण्यासाठी आरटीओ कार्यालयाच्या चकरा मारत असल्याचे समाेर आले आहे.नियमानुसार एचएसआरपी नंबर प्लेेट लावणे अनिवार्य आहे. शहरात सध्या 99 िफटमेंट सेंटर असून त्यातून 4 हजार 830 वाहनांना राेज एचएसआरपी देण्याची क्षमता आहे. वाहनधारकांनी प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन ऑनलाईन नाेंदणी करावी.