कुटुंबातील एका किरकोळ कारणातून स्वाभीमान दुखवल्यानं सासूबाईनं आपल्या सुनेचं डोकं फोडले आहे. सिडको परिसरातील त्रिवेणीनगरमध्ये रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात सासूबाई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्याच्या सिडको परिसरातील त्रिवेणीनगर याठिकाणी राहणाऱ्या फिर्यादी महिलेची 22 ऑगस्ट रोजी अचानक प्रकृती खालावल्याने ती सासूबाईनां न विचारता आंबेडकरनगर येथे आपल्या माहेरी गेली होती. सुनबाई न विचारता माहेरी गेल्यानं सासुबाईंचा स्वाभिमान दुखावला होता. त्यामुळे सासूच्या मनात सुनबाई बद्दल प्रचंड राग निर्माण झाला.
या दरम्यान रविवारी फिर्यादी महिला परत आपल्या सासरी आली. यावेळी सासून मला न विचारता तू माहेरी का गेलीस?’ या कारणावरून वाद घालायला सुरुवात केली. हा वाद वाढत गेला. यानंतर सासूबाईनं आपल्या सुनेला शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये सुनबाईचं डोकं फुटलं आहे. या घटनेनंतर जखमी सुनबाईनं सिडको पोलीस ठाण्यात आपल्या सासूविरोधात फिर्याद दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी सासूविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
सुनबाई न विचारता माहेरी गेल्यानं सासूने केले हे कृत्य…
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -