Wednesday, June 25, 2025
Homeइचलकरंजीहुपरी येथील उद्योजकाच्या कार्यालयावर 'ईडी'चा छापा

हुपरी येथील उद्योजकाच्या कार्यालयावर ‘ईडी’चा छापा

शहरातील एका उद्योजकाच्या घरावर व कार्यालयावर शुक्रवारी ‘ईडी’ने छापा टाकला. पहाटेपासून रात्रीपर्यंत त्यांच्या आर्थिक व्यवहाराच्या तपासणीचे काम सुरू होते. दरम्यान, हे उद्योजक बाहेरगावी असल्याने त्यांच्या गैरहजेरीतच कागदपत्रांची छाननी सुरू होती.

 

या छाप्याबाबत अधिकृत माहिती देण्यास किंवा घटनास्थळी प्रवेश करण्यास सर्वांना बंदी करण्यात आली होती. या घटनेची संपूर्ण चांदी उद्योगासह शहरात जोरदार चर्चा सुरू होती.

 

चांदी व्यवसाय, निधी बँक व दुबईमधील शेअर मार्केट आदी व्यवसायामुळे या उद्योजकाच्या आर्थिक व्यवहाराची व्याप्ती मोठी आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत या उद्योजकाच्या दुबईसह अनेक देशांचा प्रवास झाला असल्याने ईडीचे लक्ष यांच्यावर केंद्रित झाले आहे. बंदूकधारी कमांडोसह शुक्रवारी पहाटे 4.30 च्या सुमारास ईडीचे अधिकारी या उद्योजकाच्या घरासह निधी बँकेच्या कार्यालयावर धडकले. यावेळी हे उद्योजक किंवा त्यांचा मुलगाही घरी आढळून आले नसल्याचे समजते. या उद्योजकासह त्यांच्या कोल्हापूरमधील भागीदारीच्या घरावरही शुक्रवारी पहाटे ईडीने छापा टाकला असल्याचे समजते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -