इचलकरंजी : सामूहिक अत्याचार प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीने मानसोपचार तज्ज्ञांनी उपचारासाठी दिलेल्या सर्व गोळ्या एकाचवेळी घेतल्याने तिची प्रकृती बिघडली. गुरुवारी पहाटे हा प्रकार घडल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमागे पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांवर सातत्याने दबाव टाकला जात असल्याची चर्चा सुरू असली, तरी याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही पुष्टी झालेली नाही.
या प्रकरणात नुकताच धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर १४ वर्षीय शाळकरी मुलीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला मानसोपचारही दिले जात आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस कमी ; पाणीही उतरले; 15 बंधारे खुले
दरम्यान, औषधांच्या गोळ्या एकाचवेळी घेतल्यामुळे तिची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. तिच्या आईने या घटनेची नोंद पोलिसांकडे केली असून, प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
या घटनेनंतर महिला तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांची भेट घेतली. प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आरोपी व त्यांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
अमेरिका-इराण युद्ध पुन्हा भडकलं, आता भारतापुढे तेलाचं महासंकट? जगाचीही चिंता वाढली!
पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांवर काही व्यक्तींकडून सातत्याने दबाव टाकला जात असल्याचे आरोपही करण्यात येत आहेत. या मानसिक तणावामुळेच पीडित मुलीने औषधांचे अतिसेवन केल्याची चर्चा सुरू आहे.
पीडितेच्या आईची कठोर कारवाईची मागणी
पीडित मुलगी आणि तिच्या आईने मानसोपचारासाठी दिलेल्या सर्व गोळ्या एकाचवेळी घेतल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रा. नि. शरद मेणे यांनी दिली. तसेच, पीडित मुलगी व तिच्या कुटुंबावर कोणताही दबाव नसल्याचे काहींकडून सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि अपर पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करून कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

