Wednesday, July 23, 2025
Homeब्रेकिंगयेत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय...

येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार…

येत्या ७ जुलै २०२५ रोजी देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या कॅलेंडरनुसार या दिवशी तसे काहीच नाहीय परंतू सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामुळे नोकरदारांना, शाळांना सलग तीन दिवसांचा विकेंड मिळण्याची शक्यता आहे.

 

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार ७ जुलैला मुहर्रमची सुट्टी असण्याची शक्यता आहे. इस्लामी नववर्षाची सुरुवात म्हणून याकडे पाहिले जाते. तसे पाहिले तर कॅलेंडरमध्ये रविवारी म्हणजेच ६ जुलैला मुहर्रम दाखविण्यात आला आहे. परंतू, जर या दिवशी चंद्र दिसला नाही व सात तारखेला दिसला तर या दिवशी सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे.

 

६ की ७ जुलै हे चंद्र दिसण्याच्या तारखेवर अवलंबून आहे. सध्यातरी अधिकृतरित्या सहा तारखेला मुहर्रम आहे. यामुळे रविवार आणि सार्वजनिक सुट्टी एकाच दिवशी आलेली आहे. जर सात तारखेला सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली तर बँकांसहशाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, पोस्ट ऑफिस आणि अनेक खाजगी कार्यालये बंद राहतील. यामुळे तुम्हाला शनिवारीच म्हणजेच ५ जुलैला सर्व महत्वाची कामे उरकावी लागणार आहेत.

 

जोडून विकेंड आला असला तरी याचा फायदा फारसा होणार नाहीय. कारण अद्याप ही सुट्टी जर-तर वर आहे. यामुळे पर्यटनासाठी किंवा इतर फंक्शनसाठी तुम्हीला जायचे असेल तर ऑफिसमध्ये सुट्टी सांगूनच जावे लागणार आहे. जर ७ तारखेला सुट्टी जाहीर झालीच तर तो नोकरदारांसाठी बोनस असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -