Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्र59 हजारांत लाँच झाली Hero ची इलेक्ट्रिक स्कुटर; 92 KM रेंज

59 हजारांत लाँच झाली Hero ची इलेक्ट्रिक स्कुटर; 92 KM रेंज

देशातील आघाडीची दुचाकी निर्माता कंपनी Hero MotoCorp ने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केली आहे. Hero Vida VX2 असं या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव असून कंपनीने VX2 Go आणि VX2 Plus अशा २ व्हेरियंट मध्ये हि स्कुटर लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही विडा पोर्टफोलिओमधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. चला तर मग या स्कुटरची रेंज, फीचर्स, आणि किंमत याबाबत अगदी सविस्तरपणे जाणून घेऊयात

 

बॅटरी आणि रेंज –

Vida VX2 Go मध्ये 2.2kWh ची बॅटरी बसवण्यात आली असून एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ती 92 किमी पर्यंत अंतर पार करू शकते, तर VX2 Plus मध्ये, कंपनीने 3.4 kWh क्षमतेचा मोठा बॅटरी पॅक दिला आहे. एकदा का हि बॅटरी पूर्णपणे चार्ज केली कि मग तुम्ही V १४२ किलोमीटर पर्यंत प्रवास आरामात करू शकाल. दोन्ही स्कूटरना रिमूव्हेबल बॅटरी दिल्या जात आहेत, ज्या बाहेर काढता येतात आणि घरगुती सॉकेटशी कनेक्ट करून चार्ज करता येतात. कंपनीचा दावा आहे कि या दोन्ही बॅटरी 60 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होऊ शकतात.

 

लुक आणि डिझाईन – Hero Vida VX2 Electric Scooter

या दोन्ही इलेक्ट्रिक स्कुटरचा (Hero Vida VX2 Electric Scooter) लूक आणि तिचे डिझाईन VIDA सारखीच आहे. स्कुटर ला लांब आणि आरामदायी सीट मिळतेय ज्यामुळे गाडी चालवताना तुम्हाला कम्फर्ट फील मिळेल. २ लोक आरामात या सीटवर बसू शकतात. याशिवाय, यात एलईडी लाईट्स, स्पोर्टी लूक आणि असे अनेक बाह्य फीचर्स आहेत जे लोकांना आकर्षित करतात. स्कुटरची चाके १२ इंचाची असून चांगली ग्रीप पकडतात. हिरो च्या या इलेक्ट्रिक स्कुटरला ३३.२ लिटरची बूट स्पेस देण्यात आली आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं हेल्मेट व्यवस्थित ठेऊ शकता.

 

अन्य फीचर्स ?

अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, या इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये (Hero Vida VX2 Electric Scooter) रिमोट इमोबिलायझेशन आणि क्लाउड कनेक्टिव्हिटी, क्लाउड कनेक्टिव्हिटी आहे. तुम्ही या स्कूटर्सना तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता आणि राइड स्टॅटिस्टिक्स पाहू शकता. यामध्ये, तुम्हाला फर्मवेअर ओव्हर-द-एअर (FOTA) अपडेट्स देखील मिळतील. याशिवाय, VX2 Plus मध्ये ४.३-इंच TFT स्क्रीन आहे आणि VX2 Go मध्ये ४.३-इंच LCD स्क्रीन आहे.

 

किंमत किती?

Hero Vida VX2 Go च्या या नवीन स्कूटरची किंमत 99,490 रुपये (एक्स-शोरूम) आहे. मात्र हि स्कुटर बॅटरी-अ‍ॅज-ए-सर्व्हिस (BaaS) सबस्क्रिप्शन प्लॅन अंतर्गत लाँच करण्यात आल्याने या स्कूटरची किंमत फक्त 59,490 रुपये असेल. तर Hero Vida VX2 Plus ची किंमत १०९९९० रुपये असून BaaS अंतर्गत हि इलेक्ट्रिक स्कुटर 64,990 रुपयांत खरेदी करता येईल. BaaS पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतील. यामध्ये, तुम्हाला बॅटरी खरेदी करण्याची गरज नाही, तर तुम्ही ती भाड्याने घेऊ शकता आणि ही सेवा फक्त ९६ पैसे प्रति किलोमीटरपासून सुरू होईल. BaaS पॅकेजच्या इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, जर बॅटरी ७०% पेक्षा कमी काम करत असेल तर ती फ्री मध्ये बदलली सुद्धा जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -