घरात तो जेवत होता, त्याला मित्रांनी वाढदिवसाला जायचे म्हणून जेवणावरुन उठवले आणि तो पुन्हा घरी परतलाच नाही. त्यानंतर त्याचा मृतदेह घाटामध्ये कुजलेल्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. २९ जून रोजी ही घटना घडली होती. मृतदेह ओळखण्यापलिकडे होता. परंतू त्याच्या हातावर केवळ टॅटू असल्याने या मृतदेहाची ओळख पटली आहे.
धुळे तालुक्यातील मोर्दड गावात जगदीश ठाकरे या तरुणाचा मृतदेह कन्नड घाटात कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. जगदीश घरात जेवत असताना त्याच्या काही मित्रांनी त्याला जेवणावरुन उठवून मित्राचा केक कापण्यासाठी सोबत नेले होते. त्यानंतर जगदीश घरी परत आलाच नसल्याचे घरच्यांनी धुळे तालुका पोलिस स्टेशनात तो बेपत्ता झाल्याची नोंद केली होती.
२९ रोजी जगदीश ठाकरे हे घरात जेवण करत असतांनाच त्यांच्या मित्रांनी वाढदिवसाला जायचे सांगितल्याने जगदीश ठाकरे यांनी अर्धवट जेवण सोडून मित्रांसोबत घराबाहेर निघाले.मात्र वेळेत जगदीश ठाकरे घरी परतलेच नाही.त्यांच्या कुटूंबीयांनी धुळे तालुका पोलिस स्टेशनात बेपत्ता असल्याची नोंद धुळे तालुका पोलीस स्टेशनला केली होती.
सुत्रधाराला अटक करण्याची मागणी
यादरम्यान कन्नड घाटात अज्ञाताचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता. गोळ्या घालून हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते.त्या मृतदेहाच्या हातावर असलेल्या टॅटूमुळे तो मृतदेह जगदीश जगदाळे याचा असल्याचे उघड झाले. या घटनेनंतर जगदीश ठाकरे यांच्या तीन मित्रांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेमागील मुख्य सूत्रधाराला जेरबंद करावे अशी मागणी जगदीश ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. जगदीश ठाकरे यांच्या हत्येचे गूढ उघड झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्य सुत्रधाराला अटक करण्याची मागणी केली आहे.