यशस्वी जयस्वाल हा भन्नाट फॉर्मात आहे. कारण पहिल्या कसोटीत शतक झळकावल्यावर तो थांबला नाही, दुसऱ्या कसोटीतही त्याने धडाकेबाज शतक झळकावले. पण हे शतक यशस्वीसाठी खास ठरणार आहे.
कारण या शतकासह यशस्वीने भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा मोठा रेकॉर्ड मोडला आहे. सचिन तेंडुलकरपासून ते विराट कोहलीपर्यंत हा रेकॉर्ड कोणालाही मोडता आला नव्हता, पण यशस्वीने दुसऱ्याच सामन्यात हा मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
यशस्वी जयस्वालने दुसऱ्या कसोटीची सुरुवातच धमाकेदार केली. सुरुवातीपासून यशस्वी आक्रमक खेळायला लागला आणि त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना पळता भुई थोडी करून सोडली होती. यशस्वीची विकेट मिळवण्यासाठी त्याला डिवचण्याचा प्रयत्न इंग्लंडचे खेळाडू करत होते. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने तर भर मैदानात त्याच्याबरोबर वाद घातला होता. जेणेकरून यशस्वीचे लक्ष विचलित होईल. पण यशस्वीने आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही आणि सुनील गावस्कर यांचा रेकॉर्ड मोडत त्याने इतिहास रचला आहे.
सुनील गावस्कर यांनी परदेशात धावांचे डोंगर उभारले होते. खासकरून इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये त्यांनी धावांच्या राशी उभारल्या. सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विक्रम रचला होता. सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये दोन हजार धावा या फक्त २३ सामन्यांत केल्या होत्या. पण या सामन्यापूर्वी यशस्वी जयस्वाल फक्त २० सामने खेळला होता आणि तो सुनील गावस्कर यांच्यापेक्षा ९७ धावांची पिछाडीवर होता. पहिल्या डावात यशस्वीने ८७ धावा केल्या, होत्या. त्यामुळे दुसऱ्या डावात जेव्हा यशस्वीने १० धावा पूर्ण केल्या तेव्हा त्याने सुनील गावस्कर यांचा महारेकॉर्ड मोडीत काढला आहे. यशस्वी जयस्वालने या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या दोन हजार धावा २१ व्या सामन्यात पूर्ण केल्या आणि सुनील गावस्कर यांचा ४९ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला असून आता हा विक्रम त्याच्या नावावर असणार आहे. सचिन तेंडुलकरपासून ते विराट कोहलीपर्यंत कोणीही हा रेकॉर्ड मोडू शकले नव्हते. पण यशस्वीने मात्र इंग्लंडमधील दुसऱ्याच सामन्यात हा विक्रम आता आपल्या नावावर केला आहे.
यशस्वी जयस्वालला गेल्या सामन्यात द्विशतक झळकावण्याची संधी होती, पण त्याला ते करता आले नव्हते. दुसऱ्या डावातील पहिल्या डावात त्याचे शतक हुकले आणि दुसऱ्या डावात त्याला २८ धावांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत तो काय करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.