Saturday, July 5, 2025
Homeमहाराष्ट्र'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

‘हॉटेल भाग्यश्री’च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद…

मराठवाड्यातला नादखुळा रस्सा आणि ढवारा मटण घेऊन राज्याच्या कोनाकोपऱ्यात हॉटेल भाग्यश्री पोहोचलेलं आहे. हटके स्टाईल, स्वस्तात थाळी आणि वाट्टेल तेव्हा दांड्या.. यामुळे हे हॉटेल जसं ट्रोल झालं तसं चर्चेततही आलं.

 

हॉटेल मालक नागेश मडके यांचा वावर आता एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. लोक सेल्फी घेतात, उद्घाटनाला बोलावतात अन् हॉटेलवर तुफान गर्दी करतात.

 

हॉटेल मालक नागेश मडके यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी याबाबत घोषणा केली असून ग्राहकांना आवाहनदेखील केलं आहे. तुळजापूरपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भाग्यश्री हॉटेलचा पत्ता आता बदलणार आहे. हॉटेलपासून पाच किलोमीटर अंतरावर हे नवं हॉटेल उभं राहात आहे. तिथेच बुधवारपासून हॉटेल स्थलांतरित होईल.

 

चार दिवस सुट्ट्या

 

नागेश मडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या ५ जुलै ते ८ जुलैपर्यंत हॉटेल बंद असणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पंढरीकडे निघालेले वारकरी धाराशिवमार्गे जातात, त्यामुळे बोकडं कापणं योग्य वाटत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

 

शनिवार ते मंगळवार हॉटेल बंद असणार आहे. बुधवार, दि. ९ जुलै रोजी नवीन जागेमध्ये हॉटेल सुरु होईल. आपण देवाधर्माचं पालन केलं पाहिजे, असं मडके त्यांच्या व्हिडीओमध्ये सांगतात. त्यांच्या या भावनेमुळे नेटकऱ्यांनी कौतुक केलं. नवीन हॉटेल एकरभर जागेत असेल. त्यासाठी मडकेंनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याचं बोललं जातंय.

 

जुन्या जागेमध्ये होणारे विवाद, कमी पडणारी जागा, रस्त्यावरची पार्किंग आणि महिलांची गैरसोय, यामुळे त्यांनी नवीन आणि प्रशस्त जागेमध्ये हॉटेल स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन हॉटेल कसं असेल, त्याचा नेमका पत्ता काय असेल, याबाबत स्वतः नागेश मडके वारंवार सोशल मीडियातून प्रमोशन करणार आहेत. विशेष म्हणजे जुन्या जागेत बोकडं कापण्याचा कार्यक्रम चालूच राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -