DMart तर तुम्हाला माहितीच असेल किंवा तुमच्या घराच्या जवळील शहरात ते नक्कीच असेल.. माणसाला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू, एकाच छताखाली देणाऱ्या डीमार्टची स्थापना केली राधाकृष्ण दमाणी यांनी… मुंबईत सुरु झालेलं डीमार्ट नंतर संपूर्ण देशभर पसरलं… कपड्यांपर्यंत ते अगदी किचन मधील भांड्यांपर्यंत… आंघोळीच्या साबणापासून ते गहू- तांदळापर्यंत सर्वच वस्तू डीमार्ट मध्ये मिळत असल्याने ग्राहकांचीही तोबा गर्दी डीमार्ट मध्ये बघायला मिळते. त्यातच महत्वाचं म्हणजे इतर कंपन्यांच्या तुलनेत डीमार्ट मध्ये सर्वच वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट मिळते. परंतु तुम्हाला माहितेय का? ज्याप्रमाणे डीमार्ट आपल्या ग्राहकांना अतिरिक्त कायदे देते त्याच प्रमाणे डीमार्ट आपल्या कर्मचाऱ्यांनाही पगारा व्यतिरिक्त अनेक फायदे देते. हे फायदे नेमके कोणकोणते आहेत ते आज आपण जाणून घेऊयात…..
D Mart कर्मचाऱ्यांना कोणकोणते फायदे मिळतात? D Mart Employees Benefits
EPF (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी): डी मार्ट कर्मचाऱ्याच्या पगाराचा एक भाग EPF खात्यात जमा करते, ज्यामध्ये कंपनी देखील योगदान देते. ही ठेव निवृत्तीच्या वेळी दिली जाते, जी भविष्यासाठी आर्थिक आधार म्हणून काम करते.
कार्यक्षमतेवर आधारित बोनस: जे कर्मचारी चांगलं काम करतात त्यांना डीमार्ट मध्ये वार्षिक बोनस दिला जातो.. यामुळे कर्मचाऱ्यांना आणखी चांगलं काम करण्याचा हुरूप मिळतो. D Mart Employees Benefits
खरेदीवर डिस्काउंट – डीमार्ट आपल्या कर्मचाऱ्यांना खरेदीवर अतिरिक्त डिस्काउंट देते. इतर ग्राहकांपेक्षा हा डिस्काउंट जास्त असतो. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पैशाची बचत होते.
प्रशिक्षण आणि अंतर्गत पदोन्नती: डीमार्ट कर्मचाऱ्यांना उच्च पदांसाठी तयार करण्यासाठी नियमित प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करते. या विकास कार्यक्रमांमुळे अनेकांनी विक्री सहयोगींपासून व्यवस्थापकीय पदांपर्यंत यशस्वीरित्या झेप घेतली आहे. D Mart Employees Benefits
ग्रॅच्युइटी: जे कर्मचारी ५ वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहेत त्यांना डीमार्ट कडून ग्रॅच्युइटी दिली जाते. या ग्रॅच्युटी च्या माध्यमातून त्यांना सेवेच्या शेवटी एकरकमी रक्कम दिली जाते.
वैद्यकीय विमा: डीमार्ट केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर त्यांच्या कुटुंबांसाठी देखील आरोग्य विमा कव्हर देते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा हॉस्पिटल मधील खर्च वाचतो.