ठरलेल्या करारानुसार पगार जमा न केल्याने घंटागाडीवर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासून अचानकपणे कामबंद आंदोलन सुरु केले. मात्र चर्चेअंती पगार आदा करण्यात आल्याने दुपारपासून काम सुरु करण्यात आले. तर पगाराचा फरक सोमवारी देण्यात येईल, असे आश्वासन कंत्राटदाराच्या वतीने देण्यात आले.
विविध मागण्यांसाठी घंटागाडीवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून काही महिन्यांपासून सातत्याने आंदोलन केले जात आहे. पंधरवड्यापूर्वीच्य आंदोलनावेळी झालेल्या करारात महिन्याच्या दहा तारखेला पगार जमा करण्याचे ठरले होते. परंतु ९९ तारीख आली तरी पगार न दिल्याने शुक्रवारी सकाळपासून कर्मचाऱ्यांनी अचानकपणे कामबंद आंदोलन सुरु केले त्यामुळे शहरातील कचरा उठावाचे काम ठप्प झाले होते. तर कोणाचीह मध्यस्थी घ्यावयाची नाही असा पवित्रा घेतला होता. आंदोलनाची माहित समजल्यानंतर महापालिकेतील अधिकारी डॉ. नितीन भार हे आंदोलनस्थळ आले व त्यांनी चर्चा करत उपायुक्तांना आंदोलनाची माहिती दिली. त्यानंत कंत्राटदाराशी संपर्क साधला गेला. पण पगार झाल्याशिवाय काम करण्याचा निर्णय कर्मचान्यांनी घेतल्याने काम थांबले होते. अखे कंत्राटदाराकडून पगार आदा करण्यात आल्याने दुपारनंतर काम सुम करण्यात आले. दरम्यान, कामगारांनी पगारातील फरक मिळण्याची मागण केली असून कंत्राटदाराने सोमवारी फरक देण्याचे मान्य केल्याचे कॉ. ए. बी. पाटील यांनी