Tuesday, July 22, 2025
Homeक्रीडादोघांचा दुखापतीमुळे गेम, चौथ्या सामन्यासाठी भारताची प्लेइंग ईलेव्हन कशी असेल?

दोघांचा दुखापतीमुळे गेम, चौथ्या सामन्यासाठी भारताची प्लेइंग ईलेव्हन कशी असेल?

मँचेस्टरमध्ये इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारताच्या काही खेळाडूंना दुखापत झाली आहे. तर काहींना दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन कशी असणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने मागे आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी चौथा सामना फार महत्त्वाचा आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्यासाठी सज्ज आहे. उभयसंघातील या सामन्याला 23 जुलैपासून सुरुवात होणार आहे.

 

कुणा-कुणाला दुखापत?

भारताचा उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह आणि आकाशदीप या चौघांना दुखापतीमुळे ग्रासलं आहे. मात्र पंत चौथ्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला अर्शदीप सिंह दुखापतीमुळे चौथ्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. तर नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. तसेच आकाश दीप यालाही दुखापतीमुळे चौथ्या सामन्याला मुकावं लागू शकतं.

 

तर पंतऐवजी ध्रुवला संधी मिळणार!

ऋषभ पंतला दुखापतीमुळे मँचेस्टर कसोटीला मुकावं लागलं तर त्याच्या जागी प्लेइंग ईलेवहनमध्ये ध्रुव जुरेल याचा समावेश केला जाऊ शकतो. पंतला तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात विकेटकीपिंग करताना दुखापत झाली होती. त्यानंतर ध्रुवने विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळली होती.

 

नितीश कुमार रेड्डी आऊट

नितीश कुमार रेड्डी याला दुसऱ्या कसोटी सामन्यात शार्दूल ठाकुर याच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. नितीशला दुसऱ्या सामन्यात काही खास करता आलं नाही. त्यानंतरही नितीशचा तिसऱ्या सामन्यात समावेश करण्यात आला. नितीशला तिसऱ्या सामन्यात विजयाचा नायक होण्याची संधी होती. मात्र नितीश त्यातही अपयशी ठरला. नितीशला 4 डावात 50 धावाही करता आल्या नाहीत.

 

नितीश आता दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे नितीशच्या जागी प्लेइंग ईलेव्हनेमध्ये संधी मिळाल्यास अंशुल कंबोज याचं कसोटी पदार्पण होईल. नितीश बॉलिंग आणि बॅटिंगने योगदान देतो. नितीशने 24 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 486 धावा करण्यासह 79 विकेट्स घेतल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -