Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रफक्त महिलांचे अॅप जिथे पुरुषांवर 'तसली' चर्चा व्हायची, Tea App हॅक; 72...

फक्त महिलांचे अॅप जिथे पुरुषांवर ‘तसली’ चर्चा व्हायची, Tea App हॅक; 72 हजार फोटो चोरले, लोकेशनसह प्रायव्हसीही धोक्यात

फक्त महिलांसाठी असलेल्या, डेटिंगबाबत सल्ला देण्यासाठी बनवलेला जगप्रसिद्ध Tea अ‍ॅप हॅक झाल्याचं समोर आलं आहे. त्या माध्यमातून महिलांचे तब्बल 72,000 हून अधिक फोटोज चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलांना सुरक्षित डेटिंगसाठी प्लॅटफॉर्म देणाऱ्या या अॅपसमोर प्रायव्हसीचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

 

टी अ‍ॅपवर महिला त्यांच्या ओळखीच्या पुरुषांची माहिती, फोटोज शेअर करायच्या, त्याचे चांगले वाईट अनुभव सांगायच्या. रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग यासारख्या टर्म्स वापरून त्या इतर महिलांना सावध करायच्या. पण आता हे सगळं उलटण्याची शक्यता आहे. कारण हॅकर्सनी दोन वर्षांपूर्वीचा डेटाबेसही उघड केला आहे.

 

Tea App Hack : डेटा चोरी, लोकेशन लीक आणि प्रचंड गोंधळ

एनबीसी न्यूजच्या अहवालानुसार, हॅकर्सनी फक्त फोटोच नव्हे तर काही वापरकर्त्यांची लोकेशन माहितीही ऑनलाइन लीक केली आहे. एक गुप्त मोहीम Hack & Leak अंतर्गत ही सगळी माहिती लीक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एक वापरकर्ता या मोहिमेच्या अंतर्गत चोरलेल्या डेटाबेसचे लिंकही ऑनलाइन पोस्ट करताना दिसला.

 

What Is Tea App : सर्वाधिक डाऊनलोड होणारे अॅप

या अॅपमध्ये साईन करण्यासाठी व्हेरिफिकेशनसाठी त्या महिलेला स्वतःचा सेल्फी पाठवावा लागायचा. कंपनीने दावा केला होता की व्हेरिफिकेशनसाठी वापरल्या गेलेल्या सेल्फीज डिलीट केल्या जातात, स्क्रीनशॉट्सही ब्लॉक होते, आणि वापरकर्त्याचं फक्त युजरनेम पब्लिक असतो. पण संरक्षणाचे हे सगळे दावे फोल ठरले आहेत. सध्या हे अ‍ॅप Apple Store वर सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या फ्री अ‍ॅप्सपैकी एक होते आणि अवघ्या एका आठवड्यात 10 लाखांहून अधिक महिलांनी साइनअप केलं होतं.

 

टी अ‍ॅपच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी त्वरित उपाय सुरू केले आहेत. वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

 

डिजिटल प्रायव्हसीचं संकट वाढतंय

ही घटना केवळ टी अ‍ॅपपुरती मर्यादित नाही, तर डिजिटल युगात प्रायव्हसीवरील वाढता धोका अधोरेखित करते. अनेक महिलांनी सुरक्षित प्लॅटफॉर्म समजून अ‍ॅपवर खाजगी माहिती शेअर केली होती. पण आता तीच माहिती त्यांच्या विरोधात वापरली जाऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -