केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड असणाऱ्या रुग्णांवर सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जातात. सरकारकडून रुग्णाचा 5 लाखांपर्यंत खर्च उचलला जातो. मात्र आता आयुष्मान योजनेच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यानुसार आता काही आजारांवर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार करता येणार नाही, याचा अर्थ फक्त सरकारी रुग्णालयांमध्येच या आजारांवर उपचार केले जातील.
या आजारांवर फक्त सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आयुष्मान योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयांमध्ये मेंदू, प्रसूती आणि गर्भाशय शस्त्रक्रिया केली जात होती. मात्र आता यापुढे या तीन आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया फक्त सरकारी दवाखान्यांमध्येच केली जाणार आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये या उपचारांसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आता काही रुग्णांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
नियम का बदलले?
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पूर्वी खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये 1760 आजारांवर मोफत उपचार केले जात होते, मात्र आता काही आजारांना खाजगी रुग्णालयांमधील मोफत उपचारांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये या आजारांवर उपचार उपलब्ध असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयुष्मान कार्ड कसे बनवायचे?
तुमच्या फोनवर Ayushman App डाउनलोड करा आणि भाषा निवडा.
नंतर लॉगिन करा आणि Beneficiary वर क्लिक करा.
यानंतर कॅप्चा आणि मोबाईल नंबर टाका
फोनमध्ये Beneficiary Search पेज उघडेल.
त्यात पीएम-जे योजना निवडा आणि तुमचा राज्य, जिल्हा आणि आधार क्रमांक भरून लॉगिन करा.
यानंतर ज्या कुटुंबाचे आयुष्मान कार्ड बनले आहे त्यांची यादी दिसेल. मात्र ज्याचे कार्ड बनलेले नाही, त्यांच्या नावासमोर ऑथेंटिकेट असा पर्याय दिसेल
ऑथेंटिकेटवर टॅप करा, आधार क्रमांक टाका- ओटीपी टाका आणि फोटोवर क्लिक करा.
यानंतर, सदस्याचा फोन नंबर आणि नाते लिहा.
ई-केवायसी पूर्ण करा आणि फॉर्म सबमिट करा.
एका आठवड्यात व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुम्ही हे कार्ड अॅपवरून डाउनलोड करू शकता.
आयुष्मान कार्डसाठी लागणारी कागदपत्रे
आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड, फोन नंबर, रेशन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल. तसेच कामगार कार्ड, ई-श्रम कार्ड किंवा सरकारी ओळखपत्राच्या मदतीने तुम्ही कार्डसाठी अर्ज करण्यास पात्र आहात की नाही याची माहितीही मिळेल.