Sunday, August 3, 2025
Homeक्रीडाजीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका, 22 वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू

जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका, 22 वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू

क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची सर्वात वाईट बातमी समोर आली आहे. जीममध्ये वर्कआऊट करताना बंगालमधील 22 वर्षीय युवा खेळाडूचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्यामुळे क्रिकेटपटूच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच बंगालमधील क्रिकेट वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. बंगालकडून रणजी ट्रॉफीत खेळावं हे या युवा खेळाडूचं स्वप्न होतं. मात्र या युवा खेळाडूचे स्वप्न अधुरं राहिलं. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोलापूरमध्ये राहणारा प्रियजीत घोष आपल्यातून कायमचा निघून गेलाय. प्रियजीत याने क्रिकेट करियरची सुरुवात जिल्हा स्तरावरुन केली होती. मात्र वयाच्या 22 व्या वर्षीच प्रियजीतने जगाचा निरोप घेतला.

 

ते स्वप्न अधुरं

रणजी ट्रॉफी स्पर्धेत बंगालचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, हे प्रियजीतचं स्वप्न होतं. यासाठी प्रियजीत प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. प्रियजीतने जिल्हा स्तरावरुन कारकीर्दीची सुरुवात केली. प्रियजीतने 2018-19 या मोसमादरम्यान अंडर 16 स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा कारनामा केला होता. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रियजीतला या स्पर्धेतील कामगिरीसाठी पदक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. प्रियजीतने तेव्हा मिळालेलं पदक हे अजूनही एक आठवण म्हणून सांभाळून ठेवलं होतं. तसेच आघाडीच्या फलंदाजांपैकी एक अशी प्रियजीतची बंगालमध्ये ख्याती होती.

 

प्रियजीतसोबत जीममध्ये काय झालं?

क्रिकेटपटूंसाठी वर्कआऊटचं महत्त्व काय आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रियजीत फिट राहण्यासाठी जीममध्ये जायचा. प्रियजीत नेहमीप्रमाणे शुक्रवारी 1 ऑगस्टला बोलपूरमधील जीममध्ये गेला. प्रियजीतला वर्कआऊट दरम्यान छातीत दुखु लागलं. त्यानंतर प्रियजीतची तब्येत बिघडली. त्यानंतर जीममधील उपस्थितांनी प्रियजीतला रुग्णालयात नेलं. मात्र तोवर प्रियजीतने देहत्याग केला होता. प्रियजीतच्या कुटुंबियांनुसार तो फिटनेसबाबत फार गंभीर होता.

 

दरम्यान काही महिन्यांपूर्वी पंजाबमधील एका क्रिकेटपटूचंही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. हरजीत सिंह असं या खेळाडूचं नाव होतं. हरजीतला सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आला. हरजीतने षटकार लगावला. त्यानतंर तो मैदानात कोसळला. त्याला काय झालंय हे समजण्याआधीच हरजीतचा मैदानातच शेवट झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -