Tuesday, August 5, 2025
Homeब्रेकिंगदारुड्या मुलाने घातला बापाच्या डोक्यात दगड! आईलाही जीवे मारण्याची धमकी

दारुड्या मुलाने घातला बापाच्या डोक्यात दगड! आईलाही जीवे मारण्याची धमकी

दारुड्या मुलाने बापाच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. तसेच आईला पण मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. केज तालुक्यातील विडा येथे रहीम चाँद शेख हे दि. २ ऑगस्ट रोजी रात्री ८:०० च्या सुमारास त्यांच्या घरा समोर खुर्चीवर बसलेले असताना त्यांचा मुलगा रतन शेख हा त्यांना म्हणाला की, तू येथे का बसला ?

 

अशी विचारणा करत वडील रहीम शेख यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली. त्यामुळे रात्री रहीम शेख व त्यांची पत्नी मैमूनाबी शेख हे दोघे वृद्ध दाम्पत्य शेजाऱ्यांची घरी जेवण करण्यासाठी गेले होते. त्‍यावेळी त्‍याने आईलाही धमकी दिली.

 

आई वडील शेजारी गेला त्यावेळी सुमारे ८:१५ वाजता रतन शेख तेथे गेला आणि त्याने वडिलांच्या डोक्यात दगड मारून वडिल रहीम शेख यांचे डोके फोडले. त्या नंतर रहीम शेख यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात हलविले आहे. तेथे उपचार करून आल्या नंतर केज पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार रतन शेख याच्या विरुद्ध गु. र. नं. ४२०/२०२५ भा. न्या. सं. ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल पुरुषोत्तम शेप हे तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -