Tuesday, August 26, 2025
Homeब्रेकिंगनवा अलर्ट! पुढील 7 दिवस धोक्याचे, महाराष्ट्रासह ‘या

नवा अलर्ट! पुढील 7 दिवस धोक्याचे, महाराष्ट्रासह ‘या

राज्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील काही दिवस पावसाचा हा जोर कायम राहणार आहेत. कारण आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत वायव्य बंगालच्या उपसागरावर एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे गोवा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये पुढील सात दिवसांत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान विभागाच्या माहितीनुसार, 17-19 ऑगस्ट दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि 19-20 ऑगस्ट रोजी गुजरातमधील सौराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन दिवसांत आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशामध्येही अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, 17-18 ऑगस्टला किनारी आंध्र प्रदेशात आणि 18 ऑगस्ट रोजी ओडिशा आणि तेलंगणात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

पुढील सात दिवस पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. 17-21 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र, गुजरात, 17-20 ऑगस्ट दरम्यान कोकण, गोवा, 17 आणि 18 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

 

दक्षिण भारतातही मुसळधार पाऊस पडणार

17 आणि 18 ऑगस्ट रोजी दक्षिण भारतातील कर्नाटकच्या किनारी भागात, आंध्र प्रदेशच्या किनारी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 17 तारखेला तामिळनाडूच्या काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. 17 ते 20 ऑगस् या काळात आंध्र प्रदेशच्या किनारी भागात आणि तेलंगणातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान केरळमधील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

या राज्यांनाही पावसाचा इशारा

या काळात देशाच्या उत्तरेकडील भागातही पावसाची शक्यता आहे. 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान जम्मू आणि काश्मीर, लडाखमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 17 आणि 18 ऑगस्ट रोजी हिमाचल प्रदेश, 21 ते 23 ऑगस्ट दरम्यान उत्तराखंडमध्ये पावसाची शक्यता आहे. 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान पूर्व राजस्थान आणि 17, 18, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी पंजाबमध्ये, 22 आणि 23 ऑगस्टला हरियाणासह चंदीगड आणि दिल्लीत पावसाची शक्यता आहे. तसेच 21 ते 23 ऑगस् याकाळात उत्तर प्रदेशातील बहुतांशी भागात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -