Sunday, August 24, 2025
Homeक्रीडाफक्त रोहितच्या निर्णयाची प्रतिक्षा, शुबमन नाही हा खेळाडू होणार वनडे टीमचा कॅप्टन!...

फक्त रोहितच्या निर्णयाची प्रतिक्षा, शुबमन नाही हा खेळाडू होणार वनडे टीमचा कॅप्टन! BCCI चा प्लान तयार

श्रेयस अय्यरला आशिया कपच्या टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. पण BCCI चा त्याच्यासाठी वेगळा प्लान आहे. रिपोर्ट्नुसार श्रेयस अय्यरला वनडे टीमच कॅप्टन बनवलं जाऊ शकतं. सरपंच साहेब म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रेयस अय्यरचं येणाऱ्या दिवसात टीम इंडियात पुनरागमन होईल पण ते एका मोठ्या जबाबदारीसह. रिपोर्टमध्ये असं म्हटलय की, टेस्ट कॅप्टन बनवण्यात आलेल्या शुबमन गिलला T20 टीमच सुद्धा कॅप्टन बनवलं जाऊ शकतं. सध्या सूर्यकुमार यादव T20 टीमचा कॅप्टन आहे. तो आता 34 वर्षांचा आहे. BCCI युवा कर्णधाराच्या शोधात आहे. त्या दृष्टीने शुबमन गिलला सूर्यकुमार यादवचा पर्याय म्हणून पाहता येईल

 

श्रेयस अय्यरला वनडे टीमच कॅप्टन बनवण्याचा BCCI चा प्लान आहे. पण तो प्रत्यक्षात कधी येणार? दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार, BCCI सूत्रांनी सांगितलं की, याचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल. आशिया कपनंतर एक मोठी बैठक होईल. यात रोहित-विराटशी चर्चा करुन त्यांच्या भविष्याबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो. टेस्ट आणि T20 मधून निवृत्ती स्वीकारणारे रोहित-विराट आपल्या भविष्याबद्दल जो निर्णय घेतील, त्यानुसार पुढची रणनिती ठरवली जाईल. त्याच रणनिती अंतर्गत श्रेयस अय्यरला कॅप्टन बनवलं जाऊ शकतं. श्रेयस अय्यरला 2027 वनडे वर्ल्ड कप आधी वनडे टीमच नेतृत्व दिलं जाऊ शकतं. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.

 

BCCI च्या मते सध्या जितकं क्रिकेट खेळलं जातय, त्यात कुठल्या एका खेळाडूसाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये कॅप्टन बनून राहणं सोप नाहीय, असं रिपोर्टमध्ये म्हटलय. एक खेळाडू म्हणून तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणं आणि एक कॅप्टन म्हणून तिन्ही फॉर्मेटमध्ये उतरण खूप फरक आहे.

 

बीसीसीआयने आपली धोरण स्पष्टता दाखवून दिलीय

 

BCCI एकाबाजूला श्रेयस अय्यरला वनडे कॅप्टन बनवण्याच्या मूडमध्ये आहे, त्याचवेळी शुबमन गिलला टेस्टसोबतच T20 च कॅप्टन बववण्याचा विचार आहे. रिपोर्टनुसार आशिया कपसाठी शुबमन गिलला उपकर्णधार बनवून बीसीसीआयने आपली धोरण स्पष्टता दाखवून दिलीय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -