Monday, August 25, 2025
Homeराजकीय घडामोडीमी स्वत: देवेंद्र फडणवीसांना फोन केलेला; नेमकं काय बोलणं झालेलं?, मनोज जरांगेंनी...

मी स्वत: देवेंद्र फडणवीसांना फोन केलेला; नेमकं काय बोलणं झालेलं?, मनोज जरांगेंनी सगळं सांगितलं!

संपूर्ण महाराष्ट्र 27 ऑगस्टला गणपती बाप्पाच्या आगमनात व्यस्त असताना मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) समर्थकांसह जालन्याच्या अंतरवालीतून मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत.

 

29 ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करायचा असा निर्धार मनोज जरांगे यांनी बीडच्या मांजरसुंबा गावात पार पडलेल्या सभेत व्यक्त केला. यानंतर आज (25 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेत, मुंबईत जाणार आणि आरक्षण घेणार म्हणजे घेणारचं, असं मनोज जरांगेंनी सांगितले.

 

सरसकट गुन्हे मागे घेणार होते. मार खाऊन आमच्यावरच केसेस झाल्या. अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. तसेच न बसणाऱ्या 29 जाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ओबीसी आरक्षणात घातल्या. देवेंद्र फडणवीस खुन्नस दाखवत आहेत. आजच्या दिवस प्रेमाने सांगतो…आम्हाला मुंबईला जायचं नाही. तुम्ही आरक्षण दिल्यावर, आम्हाला मुंबईला जायची गरज नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

 

मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता- मनोज जरांगे (I had called Devendra Fadnavis- Manoj Jarange)

 

तुम्ही आरक्षण न दिल्यास मी सरकारसुद्धा उलथवून टाकू शकतो…मी सोडत नसतो, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. अंतरवली सोडल्यावर मी कोणत्याचं मंत्र्याचं ऐकणार नाही. दोन महिन्यापूर्वी मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. मला गरीब मराठ्यांच्या वेदना तुमच्या पुढे मांडायच्या आहेत, तुम्ही अंतरवालीत या, असं मी देवेंद्र फडणवीसांना म्हणालो होतो, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नसतील तर आडमुठे कोण हे मुंबईकरांनी सांगावे, असं मनोज जरांगे म्हणाले.

 

राज्यातील सर्व मराठ्यांनी व्यवसाय बंद ठेवा- मनोज जरांगे (All Marathas in the maharashtra should close their businesses – Manoj Jarange)

 

राज्यातील सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करा..व्यवसाय बंद ठेवा.. नोकरदार यांनी काम बंद करा… मुंबईकडे निघा….जगाच्या पाठीवर या विजयाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी व्हा, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं. कोणी शेताचे कारणे सांगू नका…जिथे जिथे टँकर असतील तिथे पाणी टँकर घ्या..समाजातील सर्व डॉक्टरांनी गोळ्या औषध घेऊन या…राजकारण्यांनी त्यांची वाहने द्या, असंही मनोज जरांगेंनी सांगितले. मला आंदोलन शांततेत पाहिजे. कोणी जाळपोळ दगडफेक करायची नाही, अशा सूचनाही मनोज जरांगेंनी दिल्या. आपल्या शेजारी जाळपोळ झाली तरी आपण पुढे चालायचं, असं मनोज जरांगे म्हणाले.

 

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

 

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

 

2. हैदराबाद गझेटियर लागू करा… 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

 

3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.

 

4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

 

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या…, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -