Tuesday, August 26, 2025
Homeअध्यात्मतब्बल 500 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला 5 शुभ योगांचा महासंगम; गणरायाच्या कृपेने विघ्न...

तब्बल 500 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला 5 शुभ योगांचा महासंगम; गणरायाच्या कृपेने विघ्न टळेल, एकामागोमाग मिळतील शुभवार्ता

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi 2025) दिवसाला विशेष महत्त्व आहे. बाप्पाचं आगमन अवघ्या काही तासांवर आहे. गणेशोत्सवाचा हा उत्सव पुढचे 10 दिवस चालणार आहे. या काळात भक्त आपल्या लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा करतात. या काळात ग्रहांची स्थिती देखील शुभ असणं फार महत्त्वाचं मानलं जातं. त्यानुसार, यंदा गणेश चतुर्थीला 5 दुर्लभ संयोग जुळून येणार आहेत. यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, प्रीति योग, इंद्र योग आणि ब्रह्म योगाचा समावेश आहे. तसेच, या योगांमुळे काही राशींचं (Zodiac Signs) भाग्य उजळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी हा दुर्लभ संयोग फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होतील. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. या काळात नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल.

 

तूळ रास (Libra Horoscope)

पाच ग्रहांचा दुर्लभ संयोग तूळ राशीसाठी फार सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. तसेच, वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. जर तुम्ही या काळात नवीन व्यवसाय सुरु करणार असाल तर, हा काळ तुमच्यासाठी फार शुभकारक असणार आहे. तुमचा आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसेल. तुमच्या कामाचं इतरांकडून कौतुक होईल.

 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी 5 ग्रहांचा दुर्लभ संयोग फार शुभकारक असणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी शुभ वार्ता मिळतील. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. जर तुमच्या मार्गात अडथळे निर्माण होत असतील तर ते देखील या काळात दूर होतील. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थितीत भरभराट झालेली दिसेल. तसेच, या काळात तुम्हाला मित्रांचा चांगला पाठिंबा मिळेल. त्यांच्या साथीने तुम्ही अनेक गोष्टी साध्य करु शकता. यामुळे तुम्हाला चांगलं बळ मिळणार आहे. नातेवाईकांबरोबर संबंध अधिक घट्ट होतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -