EPFO चा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय एक महिन काम केले तरीही मिळणार पेन्शन याआधी काही ठरावीक कालावधी पूर्ण केल्यानंतरच मिळत होती पेन्शनEPFO कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. ईपीएफओने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठा बदल केला आहे.
आता तुम्ही १ महिनादेखील नोकरी केली तरीही तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळणार आहे. तुमचे ईपीएसमधील पैसे तुम्हाला मिळणार आहेत.याआधी फक्त काही ठरावीक काळ नोकरी केली तरच तुम्हाला पेन्शन मिळत होती.
आता EPS च्या नियमाअंतर्गत, जर कोणी ६ महिन्यांच्या आत नोकरी सोडली तर त्यांना झिरो कम्प्लीट ईअरअंतर्गत पेन्शनचा लाभ मिळत नव्हता. दरम्यान, आता या नियमांत बदल करण्यात आला आहे. नवीन नियमाअंतर्गत आता कर्मचाऱ्यांना हा अधिकार देण्यात आला आहेत. त्यामुळे तुम्ही आता १ महिना जरी नोकरी केली तरीही तुम्हाला पेन्शनचे पैसे मिळणार आहे.
प्रत्येक कर्मचारी दर महिन्याला EPS खात्यात ठरावीक रक्कम जमा करतात. ही रक्कम तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर मिळत होती. परंतु यासाठी काही अटी होत्या. या अटींमध्ये तुम्हाला ठरावीक कालावधी केल्यानंतरच पेन्शन मिळत होती. मात्र, आता या नियमांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
ईपीएफओने आता स्पष्ट केले आहे की, जर कोणताही व्यक्ती केवळ १ महिन्यासाठी नोकरी करत असेल आणि ईपीएसमध्ये पैसे जमा करत असेल तर त्याला पेन्शनचा लाभ मिळणार आहे.नवीन नियमाचा फायदा कोणाला होणार? (EPFO New Rule Benefits)
ईपीएफओच्या या नवीन नियमांचा फायदा अनेक कर्मचाऱ्यांना होणार आहे. बीपीओ, लॉजिस्टिक्स या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने खूप कमी कालावधीत नोकरी सोडली तर त्यांना या नियमाचा फायदा होणार आहे. त्यांनादेखील पेन्शन मिळणार आहे. त्यांना पीएफमधील पैसे मिळतील. या नियमाचा कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.