Saturday, September 6, 2025
Homeमहाराष्ट्रचॅटजीपीटी डाऊन? जगभरातील अनेक यूजर्समध्ये गोंधळ

चॅटजीपीटी डाऊन? जगभरातील अनेक यूजर्समध्ये गोंधळ

चॅटजीपीटी अचानक बंद झाल्याने जगभरातील वापरकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. सोशल मिडियावर अनेकांनी तक्रारी व्यक्त केल्या आहेत. डाउनडिटेक्टरच्या अहवालानुसार, शेकडो वापरकर्त्यांनी अडचणींचा अनुभव घेतला आहे.

 

भारतातील ४३९ हून अधिक वापरकर्त्यांनी समस्यांची नोंद केली आहे. ओपनएआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

 

Chatgpt Down: अचानक बंद झाले असून जगभरातील यूजर्सचा गोंधळ उडाला आहे. याची माहिती सोशल मिडियावर यूजर्सनी दिली आहे.

 

जगभरातील चॅटजीपीटी वापरकर्त्यांना अडचणी येत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी नाराशी तर काहींनी तक्रार सोशल मिडियावर व्यक्त केली आहे.

 

ऑनलाइन सेवा स्थितीचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइट डाउनडिटेक्टरच्या मते, गेल्या २० ते ३० मिनिटांत शेकडो वापरकर्त्यांनी एआय चॅटबॉटमधील येत असलेल्या अडचणींचा अहवाल समोर आला आहे.

 

या आउटेजमुळे जगभरातील मोठ्या संख्येने वापरकर्त्यांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे, जिथे ४३९ हून अधिक वापरकर्त्यांनी डाउनडिटेक्टरवर समस्या नोंदवल्या आहेत.

 

चॅटजीपीटीच्या डेव्हलपर ओपनएआयने अद्याप या आउटेजबद्दल कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -