Thursday, September 11, 2025
Homeइचलकरंजीपाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ नागरिकांतून संताप ; पावसाळ्यात पाण्यासाठी धावाधाव

पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ नागरिकांतून संताप ; पावसाळ्यात पाण्यासाठी धावाधाव

कृष्णा आणि पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत असताना सुध्दा इचलकरंजीला आठ दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांतून विशेषतः महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त करणेत येत आहे. ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी इतरत्र धावाधाव होत असल्याने महानगरपालिकेच्या कामकाजाबद्दल संताप व्यक्त करणेत येत आहे.

 

कृष्णा नदीतून कृष्णा नळपाणी पुरवठा योजना व पंचगंगा नदीतून पाणी उपसा

 

करून इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, कृष्णेची गळती, पंचगंगा दुषित आणि तांत्रिक कारणामुळे वारंवार शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होतो. त्यामुळे शहरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

 

गेल्या आठवड्यात मजरेवाडी जॅकवेल येथून पाणी

 

उपसा करण्यात येणाऱ्या विद्युत ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने शहराचा पाणी पुरवठा ३ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास बंद करण्यात आला. महनगरपालिका प्रशासनाच्या पाठ्युराव्यानंतर महावितरणने सदरचा ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करणेत यश मिळविले. मात्र, तांत्रिक कारणामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर विपरीत

 

परिणाम झाला त्यानंतर येथील जलशुध्दी केंद्रावरील वीज पुरवठा खंडीत झाल्याने त्याचाही परिणाम झाला. कृष्णा व पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत असताना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना विशेषतः महिला वर्गाला इतरत्र आधार घ्यावा लागत आहे. तांत्रिक कारणामुळे शहराचा पाणी पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागावर रोष ओढावा लागत आहे. तेव्हा सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -