Tuesday, September 16, 2025
Homeमहाराष्ट्रबोट उलटून मोठी दुर्घटना, 86 जणांचा मृत्यू , अनेक जण बेपत्ता, बचाव...

बोट उलटून मोठी दुर्घटना, 86 जणांचा मृत्यू , अनेक जण बेपत्ता, बचाव कार्य सुरू

मोठी बातमी समोर येत आहे, उत्तर-पश्चिम कांगोच्या इक्वेटर प्रांतात शुक्रवारी मोठी बोट दुर्घटना घडली आहे, या दुर्घटनेत आतापर्यंत 86 लोकांचा मृत्यू झाला आहे, दरम्यान मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही घटना इक्वेटरच्या बसनकुसु परिसरात घडली आहे.

 

कांगोच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ही एक स्वयंचलित बोट होती, बोट उलटल्यानंतर मोठी दुर्घटना घडली आहे. ही बोट जेव्हा नदीत उलटली तेव्हा या बोटीमध्ये तिच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. तसेच प्रचंड प्रमाणात सामान देखील होतं, बोट ओव्हर लोड झाल्यानं बोट नदीमध्ये पलटी झाली, या दुर्घटनेत अनेक जण बुडाले आहेत, घटनेची माहिती मिळताच तातडीनं बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. आतापर्यंत 86 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर अजूनही अनेकजण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी ही बोट दुर्घटना घडली आहे, या बोटीमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. वजन ओव्हरलोड झाल्यानं बोट पाण्यात पलटी झाली, घटनेची माहिती मिळताच बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली, मात्र रात्र असल्यानं बचाव कार्यात अडथळा निर्माण होत होता. आतापर्यंत 86 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, तर अजूनही अनेकजण बेपत्ता आहेत.स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे, नदीच्या काठी असलेल्या गावातील लोक देखील या बचाव कार्यात सहभागी झाले असून, त्यांच्याकडून देखील बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

 

धक्कादायक बातमी म्हणजे ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये अनेकजण हे विद्यार्थी होते. हे सर्वजण शिक्षणासाठी आपल्या घरातून निघून दुसऱ्या एका मोठ्या शहरामध्ये चालले होते. त्याचदरम्यान ही बोट दुर्घटना घडली आहे, या घटनेमुळे या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना मोठा धक्का बसला असून, शहरावर शोककळा पसरली आहे. हळहळ व्यक्त केली जात आहे. ओव्हर लोडमुळे ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे. दरम्यान कांगोमध्ये घडलेली ही पहिलीच घटना नाहीये, तर यापूर्वी देखील अशा काही घटना या देशात घडल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -