आशिया कप 2025 मध्ये भारताने पाकिस्तानला हरवलं. टीम इंडियाने पाकिस्तानी संघाचा फक्त दणदणीत पराभवच केला नाही, तर त्यांना जाहीरपणे अपमानित सुद्धा केलं. टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला.
टॉसच्यावेळी टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधाराशी हात मिळवला नाही. त्या शिवाय मॅच जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी टीमला अजिबात भाव दिला नाही. भारतीय टीमच्या कुठल्याही खेळाडूने पाकिस्तानी टीममधल्या सदस्याशी हस्तांदोलन केलं नाही. पाकिस्तानी खेळाडू हँडशेकसाठी आतुर असताना टीम इंडियाने ही कृती केली. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी टीमशी हस्तांदोलन केलं नाही, त्यावरुन आता वाद निर्माण झालाय. बातमी अशी आहे की, पाकिस्तानी क्रिकेट टीमने या विरोधात आता एक पाऊल उचललय.
टीम इंडियाने हस्तांदोलन न करणं पाकिस्तानच्या जाम जिव्हारी लागलं आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमच्या मॅनेजरने PCB च्या इशाऱ्यावरुन भारतीय टीमची तक्रार केली आहे. त्याआधी कॅप्टन सूर्यकुमार यादवने पाकिस्तानवर मिळवलेला विजय पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या निरपराध नागरिकांना समर्पित केलाय. भारतीय टीमला टॉप ऑफिशियल्सकडून स्पष्ट आदेश देण्यात आलेले की, त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करु नये. टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी त्याच आदेशाच पालन केलं. भारत-पाकिस्तान मॅचच्या अर्धातास आधी एक बैठक झालेली अशी सुद्धा माहिती आहे.
पाकिस्तानी दिग्गजांच यावर म्हणणं काय?
टीम इंडियाकडून मिळालेल्या या वागणुकीनंतर पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटर संतापले आहे. बासित अली म्हणाला की, ‘हा तर आशिया कप आहे. आयसीसी टुर्नामेंटमध्ये सुद्धा असं पहायला मिळू शकतं’ बासित अली सोबत कामरान अकमलने सुद्धा भारताने दिलेल्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. दोघे एका टीव्ही शो च्या कार्यक्रमात बोलत होते. हे क्रिकेटच्या भल्याच नाही असं त्याचं म्हणणं आहे.
‘पहलगाममध्ये जे झालं, ते आम्ही विसरलेलो नाही’
भारताने असं वागून आपले खरे रंग दाखवलेत असं पाकिस्तानचा माजी विकेटकीपर फलंदाज म्हणाला. राशिद लतीफने यावरुन आयसीसीवर निशाणा साधला आहे. प्रश्न विचारलाय की, ते कुठे आहेत?. टीम इंडियाने हस्तांदोलन केलं नाही, म्हणून पाकिस्तानी टीमची जी आदळआपट सुरु आहे, त्यावरुन त्यांना सडतोड उत्तर मिळालय हे स्पष्ट होतं. पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा पोस्ट मॅच प्रेजेंटेशनसाठी आला नाही. टीम इंडियाने आपल्या कृतीतून दाखवून दिलं की, पहलगाममध्ये जे झालं, ते आम्ही विसरलेलो नाही.