Saturday, September 20, 2025
Homeयोजनानोकरीपरीक्षा न देता बँकेत मॅनेजर बनण्याची संधी! 1 लाखापेक्षा जास्त मिळणार पगार,...

परीक्षा न देता बँकेत मॅनेजर बनण्याची संधी! 1 लाखापेक्षा जास्त मिळणार पगार, लगेच अर्ज करा

तुम्हाला बँकेत नोकरणी करण्याची इच्छा आहे. मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. भारतीय स्टेट बँक (SBI)ने मॅनेजर पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ही सरकारी नोकरी विशेषतः त्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे, जे बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात करिअर घडवू इच्छितात.

 

आता अर्ज कसा करावा? शेवटची तारीख काय? जाणून घ्या सविस्तर…

 

SBI मध्ये मॅनेजर पदासाठी अर्ज प्रक्रिया 11 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.bank.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

 

अर्ज करण्यासाठी उमेदवाराला प्रथम वेबसाइटवर लॉगिन किंवा नोंदणी करावी लागेल. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 122 पदांसाठी भरती केली जाईल.

 

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराकडे MBA (फायनान्स), MMS (फायनान्स), PGDBA, PGDBM, CFA, CA किंवा ICWA ची पदवी असणे आवश्यक आहे.

या भरतीमध्ये उमेदवारांना मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल-III मध्ये समाविष्ट केले जाईल आणि नियुक्तीनंतर त्यांना 85,920 रुपये ते 1,05,280 रुपये इतका मासिक पगार मिळेल. यासोबतच 6 महिन्यांचा प्रोबेशन कालावधीही असेल.

 

तसेच, कॉर्पोरेट क्रेडिट किंवा हाय व्हॅल्यू क्रेडिटमध्ये किमान 3 वर्षांचा अनुभव असावा. उमेदवाराला क्रेडिट मॉनिटरिंग, बॅलन्स शीट आणि फायनान्शियल ॲनालिसिस यासारख्या तांत्रिक माहितीचा अनुभवही असावा.

 

यानंतर भरती नोटिफिकेशनमध्ये दिलेला फॉर्म भरावा लागेल आणि मागितलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अर्ज शुल्क म्हणून सामान्य आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना 750 रुपये जमा करावे लागतील, तर एससी/एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -