Saturday, September 20, 2025
Homeमहाराष्ट्रEPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PF च्या नियमात होणार मोठा बदल; वाचा सविस्तर

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PF च्या नियमात होणार मोठा बदल; वाचा सविस्तर

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ खाते असते. पीएफ अकाउंट हे ईपीएफओद्वारे चालवले जाते. कर्मचाऱ्याच्या पगारातील एक ठरावीक रक्कम दर महिन्याला पीएफ अकाउंटमध्ये जमा केली जाते.

 

दरम्यान, आता पीएफच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. पीएफचे पैसे काढण्यासाठी आता नवीन नियम लागू होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मात्र खूप फायदा होणार आहे.

 

आता सरकार लवकरच EPFO 3.0 लाँच करणार आहे. यामुळे ८ कोटी पीएफ कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. तुम्ही आता एटीएम किंवा यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढू शकणार आहात. यामुळे तुम्हाला कोणत्याही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही.

 

EPFO 3.0 हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म असणार आहे. त्यामुळे तुमची पीएफसंबंधित सर्व कामे ऑनलाइन होणार आहेत. ईपीएफओ EPFO 3.0 जूनमध्ये लाँच होणर होते. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे हे लाँच होण्यासाठी उशिर झाला आहे. आता सरकार दिवाळीआधी हे प्लॅटफॉर्म लाँच करु शकतात.मीडिया रिपोर्टनुसार, १०-११ ऑक्टोबर रोजी मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार आहे.या बैठकीत यावर चर्चा होऊ शकते.

 

सध्या ईपीएफओ कर्मचारी पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरतात.त्यात Form-31, 19, 10C, 10D हा फॉर्म भरुन कागदपत्रे अपलोड करतात. यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने ईपीएफओ ऑफिसमध्ये जाऊन काम करावे लागत होते.

 

EPFO 3.0 कसं करणार काम

 

या नवीन सिस्टीममुळे तुम्ही पीएफ खात्यातील पैसे यूपीआय किंवा एटीएमद्वारे काढू शकणार आहात. यासाठी काही लिमिट सेट केली जाणार आहे. यासाठी आधार ऑथेंटिकेशन गरजेचे असणार आहे. यासाठी लवकरच नियम जारी केले जातील. ही सिस्टीम लाँच झाल्यावर कोट्यवधि कर्मचाऱ्यांना आता काही क्लिकवर पैसे काढता येणार आहेत..

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -