१३ दिवस बेपत्ता राहिल्यानंतर युवकाचा मृतदेह आढळला.
रुमालात सुसाईड नोट आढळली.
परिसरात खळबळ.
यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.
१३ दिवसांपासून युवक बेपत्ता होता. आज त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. रूमालमध्ये नातेवाईकांना सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये आत्महत्या करण्यामागचं कारण लिहिलं आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
अजय शेंडे असे मृत तरूणाचे नाव आहे. १७ सप्टेंबरपासून तरूण बेपत्ता होता. १३ दिवसांपासून अजय घरात परतलाच नव्हता. त्याचे कुटुंब त्याचा शोध घेत होते. मात्र, तब्बल १३ दिवसांनंतर त्याचा मृतदेह सापडला आहे. वणीच्या कायर येथे अजयचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
अजय शेंडे हा मराठा आंदोलक होता. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यानं आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. तरूणाच्या मृतदेहाजवळ नातेवाईकांना सुसाईड नोटही सापडली.
रूमालात तरूणानं सुसाईड नोट गुंडाळली असल्याची माहिती आहे. तसेच तरूणाजवळ विषारी औषध खरेदी केलेली पावतीही आढळली. विषारी औषध पिऊनच त्यांनं आयुष्य संपवलं असल्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. तरूणाच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.




