जर तुम्ही कन्टेट क्रिएटर असाल तर युट्युबच्या कमाईच्या नियमांबाबत तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. युट्युब दर सिंगल Views साठी क्रिएटरला पैसे देत असते, परंतू याचा अर्थ हा नाही की कोणत्या व्हिडीओला १० लाख व्यूज आल्यानंतर तुम्ही मालामाल व्हाल. वास्तविक युट्युब त्यांच्या क्रिएटर्सना जाहिरातीवर आलेल्या व्यूजसाठी पैसे देत असते. जाहिरातदारांकडून मिळणाफऱ्या रकमेतून ४५ टक्के युट्युब स्वत:साठी ठेवते तर ५५ टक्के क्रिएटर्सला देत असते.
कसे काम करते यूट्यूबचे पे-पर-View सिस्टम?
एका बातमीनुसार क्रिएटर्सची कमाईसाठी युट्युबचे पे-पर-View सिस्टम काम करत असते. याचा अर्थ असा नाही की तुमच्या व्हिडीओला आलेल्या प्रत्येक View ला पैसे मिळतील. प्रत्यक्षात तुमच्या व्हिडीओवर चालणाऱ्या जाहिरातीवर मिळालेल्या व्यूजच्या प्रमाणात तुम्हाला पैसे मिळत असतात. उदाहरणार्थ जर तुमच्या एका व्हिडीओवर एक लाख व्यूज मिळाले असतील. परंतू त्यावर कोणतही जाहिरात नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. जर तुमच्या व्हिडीओवर एक लाख व्यूज आहेत. आणि त्यावर चालणाऱ्या जाहिरातीला १० हजार व्यूज मिळाले आहेत तर याच १० हजार व्यूजचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतात.
जास्त जाहिराती म्हणजे जास्त पैसे
जर तुमच्या कोणत्या व्हिडीओवर एकाहून अधिक जाहिराती सुरु आहेत. तर तुमच्या व्हिडीओच्या तुलनेत जास्त व्यूज येऊ शकतात. अशा स्थितीत तुमच्या व्हिडीओवर कमी व्यूज असली तरी तुमची चांगली कमाई होऊ शकते. वास्तविक युट्युबची स्वत:ची कमाई जाहिरातूनच होत असते. त्यासाठी केवळ जाहिरातीच्या आधारे क्रिएटर्सना पैसे दिले जात असतात.
View च्या प्रमाणात किती पैसे मिळतात ?
या प्रश्नाचे कोणतेही थेट उत्तर नाही. व्यूजच्या हिशेबाने कमाई सब्सक्राईबर्स, व्हिडीओची रिच आणि एंगेजमेंट आदी फॅक्टरवर अवलंबून असते. जर याबाबत साधारण विचार करायचा झाला तर असा अंदाज लावता येईल की एका क्रिएटर १००० एड व्यूजवर ५-१० डॉलर ( सुमारे ४४४ रुपये ते १,३३० रुपये ) पर्यंत कमाई होऊ शकते.



