Sunday, October 26, 2025
Homeकोल्हापूरकळंबा जेलमधून पसार झालेला जन्मठेपेतील कैदी अजूनही मोकाट

कळंबा जेलमधून पसार झालेला जन्मठेपेतील कैदी अजूनही मोकाट

कळंबा कारागृहात जन्मठेप भोगणारा आणि अडीच महिन्यांपूर्वी ग्राहकाची कार घेऊन पसार झालेला सुरेश आप्पासो चोथे (वय 38, रा. चोथेवाडी, गडहिंग्लज) हा कैदी अजूनही मोकाट आहे. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडील हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविला आहे.

 

कैदी सुरेश चोथे याने अनैतिक संबंधातून गडहिंग्लज तालुक्यातील एका शिक्षकाचा खून केला होता. सिंधुदुर्ग न्यायालयाने त्यास जन्मठेप सुनावली आहे. ऑगस्ट 2022 पासून चोथे कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. दि. 24 जुलैला कारागृहासमोरील जागेत सर्व्हिसिंग सेंटरवर काम करीत असताना ग्राहकाची मोटार घेऊन पळाला होता.

 

संबंधित मोटार वैभववाडी बाजारपेठेत सापडली. मात्र, पसार झालेल्या कैद्याचा आजअखेर सुगावा लागला नाही. पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी या गुन्ह्याचा आढावा घेऊन पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -