Sunday, October 26, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात मध्यरात्री थरार, जत्रेत जायंट व्हीलमध्ये १८ जण अडकले, ५ तास आकाशात...

कोल्हापुरात मध्यरात्री थरार, जत्रेत जायंट व्हीलमध्ये १८ जण अडकले, ५ तास आकाशात मृत्यूशी झुंज

कोल्हापूरमधील कागलमधल्या जत्रेत जायंट व्हील पाळण्यातून तब्बल 5 तासांनी नागरिकांची सुटका करण्यात आली. श्री गहिनीनाथ गैबीपीर ऊरूसात शुक्रवारी रात्री जायंट व्हील पाळणा उंचावर अडकला होता.

अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं पाळणा बंद पडला होता. त्यात 18 नागरिक होते. कोल्हापूर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानं त्यांना सुखरूप खाली उतरवलं. सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. पाच तास १८ जण आकाशात मृत्यूशी झुंज देत होते.

 

कागल शहरातील श्री गहिनीनाथ गैबीपीर ऊरूसात शुक्रवारी रात्री घडलेल्या प्रकाराने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ऊरूसातील बापूसाहेब महाराज चौकात उभारलेल्या एका जायंट व्हील पाळण्यामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने पाळणा बंद पडला आणि त्यात बसलेले १८ नागरिक तब्बल 5 तास अडकून राहिले. कोल्हापूर महानगर पालिकेच्या अग्निशामन दलाच्या जवानांनी दोन तासाच्या अथक प्रयत्नाने त्यांना सुखरूप खाली उतरले. रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. ऊरूसात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याने काही काळ भीती आणि गोंधळ निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच कागल पोलिस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर घावटे यांनी तत्काळ पोलिस दलासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच ऊरूस कमिटीचे सदस्यही तातडीने मदतीला पोहोचले.

 

दरम्यान, परिस्थितीचा अंदाज घेऊन कोल्हापूर मनपा अग्निशमन दल व रेस्क्यू पथक बोलावण्यात आले. या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून पाळण्यात अडकलेले सर्व नागरिक सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तांत्रिक बिघाडामुळे पाळणा बंद पडल्याची प्राथमिक माहिती आहे. वेळेवर पोलिस आणि अग्निशमन दलाने दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. दरम्यान पाळणा चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच पालिका प्रशासनाकडे याची परवानगी घेतली होती का याचेही चौकशी सुरू आहे. साडेआठच्या सुमारास हा पाळणा कॅपॅसिटीच्या वर गेल्यावर लॉक झाला. हा लॉक काढण्याचे पाळणा मालकाकडून प्रयत्न सुरू होते, पण लॉक निघालं तर तिथून सरळ अडीच ते तीन फूट खाली येऊन दुसऱ्या लॉक मध्ये तो पाळणा अडकला असता आणि हा माणसांचा झोला पाळण्याला सहन होईल की नाही ही शंका त्या मालकांना आली आणि त्यातून त्यांनी दुसरा काय प्रयोग करता येईल काय याची चर्चा सुरू केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -