Thursday, October 30, 2025
Homeमहाराष्ट्रयंदा विद्यार्थ्यांची लवकरच कसोटी; 10 वी अन् 12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा...

यंदा विद्यार्थ्यांची लवकरच कसोटी; 10 वी अन् 12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर

एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे दहावी (SSC)आणि बारावी बोर्डाच्या (HSC) परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावी बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे.

 

तर दहावी बोर्ड परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. यंदाच्या वर्षी सुद्धा दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. कारण, 12 वी बोर्ड परीक्षा ही फ्रेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात असते, तर दहावीची परीक्षा ही मार्च महिन्यात सुरू असते. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Pune) घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र 10 वीच्याफेब्रु-मार्च 2026 च्या परीक्षांच्या तारखांबाबत शासनाने परिपत्रक जारी केलं असून परीक्षा लवकर होत आहेत.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी-मार्च 2026 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वीआणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र 10 वी परीक्षेच्या लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा तारखांना आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, 12 वीचीलेखी परीक्षामंगळवार 10 फेब्रुवारी 2026 ते बुधवार 18 मार्च 2026 (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षेसह) होणार आहे. तर, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र 10 वीची परीक्षा कालावधीशुकवार20 फेब्रुवारी 2026 ते बुधवार 18 मार्च 2026 रोजी घेण्यात येणार आहेतच.

 

दरम्यान. शासनाच्या परिपत्रकानुसार 12 वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा या 23 जानेवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणार आहेत. तर दहावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन तसेच अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत.

 

तोंडी अन् प्रॅक्टीकल परीक्षेचीही तारीख जाहीर (Practicle exam ssc)

 

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षाशुकवार23जानेवारी2026तेसोमवार09फेब्रुवारी2026 रोजी(माहितीतंत्रज्ञान व सामान्यज्ञानविषयांच्याप्रात्यक्षिकपरीक्षेसह) सोमवार02फेब्रुवारी2026तेबुधवार18फेब्रुवारी2026 (शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्रविषयांच्याप्रात्यक्षिकपरीक्षेसह) शाळा/ कनिष्ठमहाविद्यालय व विद्यार्थीयांनाअभ्यासक्रमाचेनियोजनकरण्याचेहेतूनेतसेचविद्यार्थ्यांच्यामनावरीलताणकमीहोण्याचेदृष्टीनेफेब्रुवारी-मार्च2026परीक्षेच्याप्रात्यक्षिक व लेखीपरीक्षेच्यातारखाजाहीरकरण्यातआल्याआहेत. उपरोक्तपरीक्षांचेविषयनिहायसविस्तरअंतिमवेळापत्रकस्वतंत्रपणेमंडळाच्यासंकेतस्थळावरयथावकाशजाहीरकरण्यातयेईल, असेहीसांगण्यातआलेआहे. महामंडळाचेसहसचिव प्रमोद गोफणे यांच्या सहीनेयाबाबतचेपरिपत्रकजारीकरण्यातआलेआहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -