Wednesday, November 12, 2025
Homeमहाराष्ट्रमैत्रिणीचा खून केल्याचे सांगत तो पोलिस ठाण्यात हजर';मृतदेह टाकला नदीत, सांगली पाेलिस...

मैत्रिणीचा खून केल्याचे सांगत तो पोलिस ठाण्यात हजर’;मृतदेह टाकला नदीत, सांगली पाेलिस यंत्रणा हादरली

किरकोळ वादातून मैत्रिणीचा गळा आवळून खून केल्याचे सांगत एक तरूण ईश्‍वरपूर पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्याच्या या माहितीने पोलिस यंत्रणा हदरून गेली. त्याच्या माहितीनुसार रेस्क्यू पथकाच्या मदतीने पोलिसांनी तातडीने मृतदेह शोधण्यासाठी मोहिम राबवण्यात सुरूवात झाली

 

सायंकाळी उशीरा मिळालेल्या माहितीनुसार त्या मैत्रिणीची दुचाकी ताकारी (ता. वाळवा) येथील नदीपत्रात आढळून आली आहे. या घटनेमुळे बोरगाव आणि ईश्‍वरपूर परिसरात खळबळ उडाली आहे. संशयित तरूण हा ईश्‍वरपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. आर्थिक वादातून हे कृत्य केल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

 

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पीडिता ही वाळवा तालुक्यातील एका परिसरात दोन मुलींसह राहत होती. त्यांचे पती कर्नाटकात मजूरीचे काम करतात. पीडिता खासगी रुग्णालय, खानावळ सारख्या ठिकाणी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. याच कालावधीत बोरगाव येथील संशयित तरूण आणि त्यांचा परिचय झाला.

 

तरूणाची आई आजारी असताना त्यांना उपाचारासाठी इस्लामपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हा या दोघांचा परिचय वाढत गेला आणि मैत्री झाली. यातून काही आर्थिक व्यवहारही झाले होते. त्यातून सातत्याने वाद देखील होत असल्याचे काहींनी सांगितले.

 

दरम्यान, काल सायंकाळी पीडित त्या तरूणासोबत साडेपाच वाजता घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्या परत आल्याच नाहीत. रात्री उशीर पर्यंत आणि आज दुपारपर्यंत त्यांची वाट पाहून कुटुंबियांनी ईश्‍वरपूर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

 

दरम्यान पीडितेचा घातपात झाला असण्याची शक्यता काही जणांनी पोलिसांकडे व्यक्त केली. त्यानंतर काही वेळानंतर संशयित तरूण पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने खून केल्याचे सांगतचा पोलिस यंत्रणा हदारून गेली. मैत्रिणीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरून कृष्णेत फेकून दिला. त्यानंतर दुचाकीही फेकल्याचा दावा त्याने केला.

 

पोलिसांनी तत्काळ शोध मोहिम राबवण्यास सुरूवात केली. या घटनेमुळे बोरगाव आणि ईश्‍वरपूर परिसरात खळबळ उडाली. सांगलीतील आयुष हेल्पलाईनच्या मदतीने नदीत शोध मोहिम सुरू केली. रात्री उशीरा त्या पीडितेची दुचाकी नदीपात्रात मिळून आली. त्यानंतर मृतदेह शोधण्यास सुरूवात केली. मात्र अंधार असल्याने शोध मोहिम थांबवण्यात आली. उद्या पुन्हा शोध मोहिम राबवण्यात येणार असल्याचे पोलिसंनी सांगितले. पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ व त्यांचे पथक शोध मोहिमेत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -