Monday, November 24, 2025
Homeतंत्रज्ञान6500mAh बॅटरी, 1TB स्टोरेजसह Oppo Reno 15Pro लाँच, जाणून घ्या किंमत अन्...

6500mAh बॅटरी, 1TB स्टोरेजसह Oppo Reno 15Pro लाँच, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

स्मार्टफोन ब्रँड असलेल्या ओप्पो कंपनीने त्यांची नवीन फोन सिरीज ओप्पो रेनो 15 सिरीज लाँच केली आहे. या सिरीज अंतर्गत रेनो 15 प्रो आणि रेनो 15 या दोन स्मार्टफोनचा समावेश आहे. नवीन फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी चिपसेट तसेच 16 जीबी पर्यंत रॅम आणि 1 टीबी स्टोरेज सारखे प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत.

 

दोन्ही स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि एमोलेड डिस्प्ले आहे. रेनो 15 सिरीजची विक्री २१ नोव्हेंबरपासून चीनमध्ये सुरू होणार आहे.

 

ओप्पो रेनो 15 सिरीज: किंमत आणि उपलब्धता

 

ओप्पो रेनो 15 प्रो 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 3,699 चिनी युआन म्हणजेच आपल्या भारतीय चलनानुसार अंदाजे 46 रुपये पासून सुरू होते. तसेच या फोनच्या 512 जीबी आणि 1 टीबी मॉडेलची किंमत 3,699 चिनी युआन ते 4,799 चिनी युआन अंदाजे 50 हजार ते 60 हजार रुपये पर्यंत खरेदी करता येणार आहे.

 

रेनो 15 चे बेस मॉडेल 2,999 चिनी युआन आपल्या भारतीय चलनानुसार अंदाजे 37 हजार रुपये मध्ये खरेदी करता येईल, तर हाय-एंड 1 टीबी व्हेरिएंटची किंमत 3,999 चिनी युआन अंदाजे 50 हजार रुपये आहे.

 

तर 21 नोव्हेंबरपासून हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध होतील, रेनो 15 प्रो तीन रंगांच्या पर्यायांमध्ये आणि रेनो 15 चार रंगांमध्ये उपलब्ध असेल.

 

रेनो 15 प्रो, रेनो 15: डिझाइन आणि डिस्प्ले

 

ओप्पो रेनो 15 प्रो मध्ये 6.78 इंचाचा फुल-एचडी+ फ्लेक्सिबल एमोलेड डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 1800 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. त्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो 95.5% आहे.

 

दुसरीकडे, रेनो 15 मध्ये थोडा लहान 6.32 इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि उच्च ब्राइटनेसला देखील सपोर्ट करतो. दोन्ही फोन 1.07 अब्ज रंग आणि DCI-P3 कलर गामट प्रदान करतात, ज्यामुळे उत्कृष्ट व्हिज्युअल क्वालिटी पाहायला मिळते.

 

रेनो 15 प्रो, रेनो 15: चिपसेट, कॅमेरा आणि बॅटरी

 

रेनो 15 प्रो मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8450 चिपसेट आहे, जो 16 जीबी रॅम आणि 1 टीबी स्टोरेजसह येतो, ज्यामुळे तो मल्टीटास्किंग आणि गेमिंग दोन्हीसाठी पॉवरफुल बनतो. दोन्ही फोनमध्ये 200 एमपी प्रायमरी कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी 50 एमपी कॅमेरा उपलब्ध आहे.

 

बॅटरीच्या बाबत बोलायचे झाले तर रेनो 15 प्रो मध्ये 6500 एमएएचची मोठी बॅटरी आहे, जी दीर्घकाळ टिकणारी बॅटरी लाइफ देण्याचे आश्वासन देते. तर रेनो 15 मध्ये स्टोरेज आणि परफॉर्मन्स देखील आहे, जो 1 टीबी पर्यंत स्टोरेज देतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -