Wednesday, December 17, 2025
Homeमहाराष्ट्रक्लासमध्ये एका बेंचवर बसले, अचानक विद्यार्थ्याचा गळा चिरला, DYSP नी सांगितला थरारक...

क्लासमध्ये एका बेंचवर बसले, अचानक विद्यार्थ्याचा गळा चिरला, DYSP नी सांगितला थरारक घटनाक्रम

पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगरमध्ये सोमवारी सकाळी एका दहावीच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. एका मित्रानेच ही हत्या केल्याचं समोर आलं आहे.आरोपी मुलाने क्लास सुरू असताना अचानक बेंचवर शेजारी बसलेल्या मुलावर हल्ला केला. त्याने मानेवर आणि पोटावर वार केले. या हल्ल्यात दहावीच्या मुलाचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

 

दरम्यान, संपूर्ण जिल्ह्याला हादरवणाऱ्या या घटनेवर खेडचे डीवायएसपी अमोल मांडवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तीन महिन्यांपूर्वीची संबंधित दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये भांडण झालं होतं. त्याची माहिती पोलिसांना कळवली असती तर ही घटना टळली असती, असंही डीवायएसपींनी सांगितलं.

पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

 

 

या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगताना अमोल मांडवे म्हणाले, पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये दहावीतील मुलाची हत्या झाली आहे. मित्रानेच गळा चिरुन ही हत्या केली असून हत्येनंतर तो पसार झालाय. पण या दोघांमध्ये तीन महिन्यांपूर्वी भांडण झालं होतं. त्याचवेळी पोलिसांना याबाबत कळवलं असतं. तर कदाचित ही घटना घडली नसती, असं डीवायएसपी अमोल मांडवे यांनी माहिती दिली.

 

हल्ला करणाऱ्या मुलाने गळ्यावर आणि पोटात चाकूने वार केले. शिकवणीमध्ये एका बेंचवर बसलेले असताना ही धक्कादायक घटना घडली. आता हल्ला करणाऱ्या मुलाचा शोध सुरुये. पालकांनी या घटनेतून बोध घ्यायला हवा आणि स्वतःच्या मुलांसोबत योग्य ते संभाषण ठेवायला हवं. आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत? ते फावल्या वेळेत काय करतात? कुठं बसतात? याची माहिती पालकांनी ठेवावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?

 

 

हत्येची ही घटना घडल्यानंतर एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने हत्येचा थरार कसा घडला? याची सविस्तर माहिती दिली आहे. प्रत्यक्षदर्शी वैभव मटकर यांनी घटनेची माहिती देताना सांगितलं की, ज्यावेळी मी घरातून बाहेर आलो. तेव्हा क्लाससमोर खूप विद्यार्थी आणि लोक जमले होते. मॅडमच्या संपूर्ण शरीराला रक्त लागलं होतं. हल्ला झालेला मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मानेला आणि पोटावर वार झाले होते.”

 

या घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने मुलाला दुचाकीने आधी खासगी रुग्णालयात नेलं. पण खासगी रुग्णालयाने त्याला घेतलं नाही. त्यामुळे रुग्णवाहिका बोलवून त्याला सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या दोन मुलांमध्ये आधी भांडणं झाली होती. त्यानंतर याच भांडणातून वार केले. हा हल्ला क्लासमध्ये झाला होता. त्यानंतर मॅडम जखमी विद्यार्थ्याला घेऊन बाहेर आल्या. बाहेर आणल्यानंतर त्याला रुग्णालयात हलवलं, अशी माहितीही प्रत्यक्षदर्शींनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -