नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
नवीन वर्ष सुरू झाले की सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रातीचा सण मकर संक्रांतीच्या आधी आणखीन एक सण येतो, त्या सणाला आपण भोगी असे म्हणतो. भोगी या सणाला खूप महत्त्व आहे. हा सण फक्त भोगीची मिक्स भाजी करण्यापुरताच मर्यादित नसतो, तर या दिवशी बरेच काही उपाय देखील केले जातात. या दिवशी केलेल्या उपायामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरातील काही वस्तू काढायचे आहेत.
या दिवशी जर आपण आपल्या घरातून या वस्तू बाहेर काढल्या तर आपल्या घरामध्ये होणारे त्रास, रोगराई, राहू केतूचा होणारा त्रास इत्यादी त्रासापासून आपली सुटका होणार आहे. ज्या घरामध्ये निरुपयोगी वस्तू आहेत तुटलेले खराब झालेल्या वस्तू आहेत त्या वस्तूंचा साठा जर करून ठेवला तर त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो. आणि या ज्या आपल्याला नको असलेल्या वस्तू आहेत त्या वस्तू जर जाळ्यात तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येणार आहे. हा उपाय जुना आणि शास्त्रशुद्ध पद्धतीचा आहे.
आपल्या घरात जुना झालेला झाडू म्हणजेच साळूता असेल तर तो साळुता देखील आपल्याला फेकून द्यायचा आहे. त्यासोबतच खराब झालेले बूट, चप्पल, पायपुसणी अशा वस्तू सर्वच आपल्याला या दिवशी टाकून द्यायचे आहेत. किंवा त्या जाळायचे आहेत. बऱ्याच वेळेला असे होते की झाडू खराब झाला आहे. म्हणून घरात वापरण्यासाठी नवीन झाडू आणला जातो. आणि बाहेर वापरण्यासाठी तो आहे तो जुना खराब झालेला झाडू ठेवला जातो. त्या झाडूने दार लोटण्याचे काम केले जाते. परंतु तो खराब झालेला झाडू चप्पल बूट पायपुसणी या सगळ्या वस्तू आपल्याला या दिवशी जाळायचे आहेत.
त्यासोबतच आपल्या घरामध्ये मातीची फुटलेली भांडी असतील किंवा स्टीलची जर्मनची चिरलेली, चेपलेली, खराब झालेली भांडी जी भांडी, आपल्या वापरात नाहीत ती भांडी देखील या दिवशी आपल्याला आपल्या घराबाहेर काढायची आहेत. त्यासोबतच खराब झालेले घड्याळ बंद पडके घड्याळ हे घड्याळ देखील काढायचे आहे. घरामध्ये बंद पडलेले घड्याळ ठेवायचे नाही. घरात बंद पडले की आपली प्रगती देखील थांबते असे मानले जाते त्यामुळे बंद पडके घड्याळ देखील आपल्याला भोगीच्या दिवशी घराबाहेर काढून टाकायचे आहे. त्यासोबतच घरातील फाटकी कपडे, जुनी कपडे ही सगळी कपडे गोरगरिबांना दान करायची आहेत.
भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करायची आहे. त्यानंतर दारात सोडा रांगोळी करून घ्यायची आहे. आणि मनामध्ये सकारात्मक विचार देवासमोर प्रार्थना करायची आहे. काही ठिकाणी भोगीची होळी देखील पेटवली जाते. त्या होळीजवळ डोळे मिटून आपल्या घरासाठी सुख, समाधान, समृद्धी मागून घ्यायचा आहे. हा उपाय भोगीच्या दिवशी केल्याने घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते. आणि भोगीचा आशीर्वाद आपल्याला लागतो. भोगीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी मिठाची पाच खडे आणि चिमूटभर हळद घातलेला भात घराबाहेर ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी तो बाहेर फेकून द्यायचा आहे. असे केल्याने घरामध्ये सुख समाधान येणार आहे.






