Friday, February 13, 2026
Homeकोल्हापूरविरोधी पक्षनेता निवडीदरम्यान काँग्रेसचे अनिल रावळ यांना हार्ट अटॅक; कोल्हापूर महानगरपालिकेत दुर्दैवी...

विरोधी पक्षनेता निवडीदरम्यान काँग्रेसचे अनिल रावळ यांना हार्ट अटॅक; कोल्हापूर महानगरपालिकेत दुर्दैवी घटना

कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या विरोधी पक्षनेता निवडीसाठी बैठक बोलावण्यात आलेली होती. बैठक सुरु असतानाच सभागृहाच्या बाहेर नगरसेवक राजू लाटकर यांचे समर्थक अनिल रावळ यांना हृदयविकाराचा धक्का बसला

 

सर्वांनी धावपळ करीत त्यांना रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

 

कोल्हापूरच्या महापौरपदी रूपाराणी निकम यांची निवड झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिनंदन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याच बैठकीत काँग्रेसचे नगरसेवक राजेश लाटकर यांच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी पत्र देण्याचा कार्यक्रम छत्रपती ताराराणी सभागृहात सुरू होता.

 

या बैठकीदरम्यान एक एक दुर्दैवी घटना घडली आणि आनंदाच्या वातावरणावर शोककळा पसरली. बैठक सुरू असतानाच सभागृहाच्या बाहेर काँग्रेसचे नगरसेवक राजू लाटकर यांचे समर्थक अनिल रावळ हे उपस्थित होते. अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच सभागृहात एकच धावपळ उडाली.

 

ही बातमी समजताच महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर आणि काँग्रेसचे सर्व नगरसेवक तात्काळ सभागृहाच्या बाहेर धावले. घटनास्थळी उपस्थित नगरसेवकांनी रावळ यांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक राजू लाटकर, विजय हेगडे, रोहित कवाळे आणि विनायक फाळके यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न करता स्वतःची गाडी बोलावून अनिल रावळ यांना तातडीने रुग्णालयात हलवले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत अनिल रावळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -