Wednesday, March 11, 2026
Homeमहाराष्ट्रपेट्रोल-डिझेलचा साठा किती दिवस पुरेल? मार्च अखेरपर्यंत मोठं संकट ओढवण्याची भीती

पेट्रोल-डिझेलचा साठा किती दिवस पुरेल? मार्च अखेरपर्यंत मोठं संकट ओढवण्याची भीती

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा भडका दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी व्यावसायिक सिलिंडर विक्री बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे कंपन्यांना मिळणारं गॅसवरही निर्बंध लावले जात आहेत.

 

दरम्यान महाराष्ट्रातील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी साठ्या संदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. यानुसार, सध्या राज्यात १५ ते १८ दिवस पुरेल इतकाच पेट्रोल आणि डिझेलचा साठा असल्याचं सांगितलं जात आहे. वेळेत हे युद्ध थांबलं नाही तर त्याचे गंभीर पडसाद भविष्यात भोगावे लागू शकतात.

 

सध्या महाराष्ट्रात किती साठा शिल्लक? l Maharashtra Petrol and Diesel Stock

 

दरम्यान अन्न धान्य पुरवठा विभागाकडून LPG, पेट्रोल, डिझेल यांचा साठा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानुसार, सध्या महाराष्ट्रात एलपीजी ४८,५३३२ दशलक्ष टन इतका साठा उपलब्ध असून सरासरी प्रतिदिन ९,६२८ दशलक्ष टन विक्री होते. तर सध्या महाराष्ट्रात पेट्रोलचा एकूण साठा २,००,३४८ किली असून दररोज १,४०,०० किली विक्री होते. त्याशिवाय राज्यात सध्या ४,६५,९२५ किली साठा उपलब्ध असून २५,६७७ किली दररोज विक्री केली जाते. त्याशिवाय केरोसिनचा एकूण साठा ५,८८२ दशलक्ष टन साठा उपलब्ध असल्याची माहिती आहे.

 

LPG – ५ ते ६ दिवस पुरेल

पेट्रोल – १५ दिवस

डिझेल – १८

 

घरगुती गॅस सिलिंडर बुकिंकवर निर्बंध

 

मुंबईमध्ये घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याच वेगवेगळ्या गॅस एजन्सीच्या माध्यमातून सांगितले जात आहे. मात्र घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर बुकींगवर काहीशी निर्बंध लावण्यात आली आहेत. यापूर्वी आठ दिवसात तुम्हाला दुसरं गॅस सिलिंडर विकत घेता येत होतं. मात्र आता तुम्ही एकदा सिलिंडर विकत घेतल्यानंतर दुसरं सिलिंडर बुक करण्यासाठी एक महिना थांबावं लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -