Monday, March 23, 2026
Homeकोल्हापूरपुजाऱ्यांनी चुकीचे काही केलेले नाही’, जोतिबा मंदिर प्रशासन भक्तांना लाथा मारणाऱ्यांच्या पाठीशी,

पुजाऱ्यांनी चुकीचे काही केलेले नाही’, जोतिबा मंदिर प्रशासन भक्तांना लाथा मारणाऱ्यांच्या पाठीशी,

कोल्हापुरच्या जोतिबा (wrong)मंदिरामध्ये पुजाऱ्यांकडून भाविकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या पुजाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात असतानाच आता मंदिर प्रशासनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या भाविकांना मंदिराच्या आवारातच मारहाण का करण्यात आली याचं कारण सांगितलं आहे. मंदिर प्रशासनाने पुजारी एवढे का संतापले आणि या भाविकांना का मारहाण झाली यामागील कारण सांगितलं आहे.बदनामी करण्याचा कटव्हायरल झालेला व्हिडीओ हा, ‘पुजारी समाजाची बदनामी करण्याचा कट’ असल्याचं श्री क्षेत्र जोतिबा मंदीर ऑफिसियल पेज वरुन म्हटलं आहे.

 

तसेच ज्या भाविकांना मारहाण (wrong)झाली ते दारु पिऊन आले होते असा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. ‘श्री क्षेत्र जोतिबा डोंगरच्या व्हिडिओची सत्य परिस्थिती, दारू पिलेल्या भाविकाची चूक न बघता पुजारी समाजाची बदनामी करण्याचा कट,’ या मथळ्याखाली पोस्ट लिहिण्यात आली आहे. व्हिडिओत आहे काय?व्हायरल झालेला व्हिडीओ दर्शनाच्या रांगेमध्ये वरुन जाण्यासाठी जी सोय करण्यात आली आहे त्या लोखंडी पायऱ्यांवरुन काढण्यात आल्याचं लक्षात येत आहे. व्हिडीओमध्ये दोन भाविकांच्या अंगावर पुजाऱ्यांचे दोन गट अक्षरशः तुटून पडल्याचं दिसत आहे.

 

यापैकी दोन्ही भाविक अचानक (wrong)झालेल्या या हल्ल्यामुळे अगदी जमिनीवर पडले. तर जमिनीवर पडलेल्या या भाविकाच्या पोटावर आणि अंगावर लाथा मारताना दिसत आहेत. दोन्ही भाविकांना भिंतीजवळ अडवून ही मारहाण केली जात आहे. अगदी आवेशाने पुजारी या भाविकांना मारहाण करताना दिसत आहेत. दोन ते तीन पुजाऱ्यांकडून भाविकांच्या डोक्यात नारळ सुद्धा मारल्याचे व्हिडिओतून समोर आलं आहे. या पुजाऱ्यांना अखेर इतर भाविकांनी थांबवलं. मात्र सुरुवातीला या भाविकांनी पुजाऱ्यांना हल्ल्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांनाही काही प्रमाणात या पुजाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचं दिसून आलं आहे.मंदिर प्रशासनाचं म्हणणं काय? ‘ते दोन भाविक नव्हते तर पूर्ण गाव होते, त्यांनी…’”जोतिबा डोंगरावरील तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे. ते भक्त परिते गावची लोक आहेत.

 

 

 

100 ते 200 जण आलेले. (wrong)त्यांनी मंदिरात दारू पिऊन वयस्कर लोकांना मारहाण केली. महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जोतिबा देवांच्या आरतीमध्ये अडथळा आणला आहे. धक्काबुक्की केली आहे. त्या भविकांवर पोलीस केस झाली आहे. ते दोन भाविक नव्हते तर पूर्ण गाव होते. ते सर्व लोक दारू पिऊन होते. तसेच देवळात देवाच्या आरतीचा ढोल वाजवणाऱ्या एका वृद्ध पुजाऱ्याचे धोतर त्यांनी फेडले. तसेच देवस्थान इन्चार्जवरती पण हात उचलला,” असा आरोप या पोस्टमधून करण्यात आला आहे.पुजाऱ्यांनी चुकीचे काही केलेले नाही”आधी देवस्थान कर्मचारी यांच्याबरोबर वाद झाला पण ते न्यूज चॅनेलला दाखवले नाही. मंदिर परिसरात खूप दंगा केला. आजुबाजूला जे त्यांच्या आडवे येईल त्यांच्या डोळ्यात गुलाल मारण्याचा प्रयत्न करत होते.

 

पण न्यूज चॅनेलचे वार्ताहर (wrong)वरील सत्य परिस्थिती न पाहता चुकीच्या संदेशाची बातमी देत आहेत. श्री क्षेत्र ज्योतिबा पुजारी समाजाची बदनामी होत आहे. भाविकांनी मंदिराचे पावित्र्य, शिस्त बिघडवली, महिलांसमोर बेशिस्त वर्तन केले व देवकार्यात अडथळा आणल्याबद्दल त्या मद्यपी भक्तांवर कारवाई करण्यात यावी. पुजाऱ्यांनी चुकीचे काही केलेले नाही. सत्य परिस्थिती पाहावी व भाविकांवर योग्य कारवाई व्हावी,” असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -