लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात मार्च-एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.अनेक महिलांच्या खात्यात ३००० रुपये आले आहेत. लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. परंतु अनेक महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
लाडकी बहीण योजनेत मार्च महिन्याचा हप्ता दोन महिन्यांसाठी लांबणीवर गेला आहे. त्यानंतर आता दोन्ही हप्ते एकत्र मिळत असल्याने लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. पैसे जमा न होण्यामागची अनेक कारणे असू शकतात.
या महिलांना मिळाला नाही लाभ (Ladki Bahin Yojana These Women Will Not Get Benefit)
लाडकी बहीण योजनेचे काही निकष ठरवून देण्यात आले आहे. यामध्ये पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळत आहे. याचसोबत ज्या महिलांनी केवायसी केले त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. एका कुटुंबातील फक्त एकच महिला योजनेचा लाभ घेऊ शकते. महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. सरकारी नोकरी करत असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना योजनेचा लाभ मिळत नाही. दरम्यान, याचसोबत ज्यांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नाही त्यांचाही लाभ बंद करण्यात आला आहे.
याचसोबत सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य केले होते.केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. त्यांना यापुढे एकाही महिन्याचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे तुम्हीही या सर्व निकषांमध्ये पात्र नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये.


