पूर्वीच्या जुन्या वादातून सत्यावर अडवून एकास शिवीगाळ व मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अमर चंद्रकांत साळुंखे (वय १९ रा. भोनेमाळ) याने फिर्याद दिली आहे.
अमर साळुंखे हा बुधवारी रात्री आपल्या मित्र-मैत्रिणीसमवेत दुचाकीवरुन घरी परतत असताना छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या सातजणांनी अमर वाचा पाठलाग करत अमर याची दुचाकी अडवली. गाडीची चावी काढून घेत त्याला शिवगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सोबतच्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अमन आणि उमेश यांनी एका युवतीशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. तर पृथ्वीराज याने तुला सोडत नाही, बघून घेतो अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण, समद सनदी (दोघे रा. षटकोन चौक), अमन रामकुमार धिमान (वय १८ रा. भारतमाता सोसायटी), उमेश (रा. गणेशनगर), प्रविण गोसावी (रा. गोसावी गल्ली) व अन्य दोघे अशा सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






