Homeमहाराष्ट्रधावत्या केएमटीचे चाक तुटले अन् दुचाकीवर आदळले; अनेकांच्या काळजात धस्स झाले

धावत्या केएमटीचे चाक तुटले अन् दुचाकीवर आदळले; अनेकांच्या काळजात धस्स झाले

प्रवाशांनी खचाखच भरून कागलकडे जाणाऱ्या केएमटी बसचे चाक सायंकाळी पापाची तिकटी ते पान लाईन रस्त्यावर निखळले. त्यानंतर बस तिथेच थांबल्याने मोठी हानी टळली; पण प्रचंड गजबजलेल्या परिसरात झालेल्या या थरारक घटनेने अनेकांना धडकी भरवली.

 

निखळलेले चाक धडकल्याने दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले.

 

बोंद्रेनगर ते कागल ही व्हाया तावडे हॉटेलमार्गे जाणारी बस सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पापाची तिकटी चौकात आली. ४० प्रवाशांनी खचाखच भरलेली बस चौक पार करून पानलाईनच्या दिशेने जाताना छत्रपती संभाजीमहाराज स्मारकाजवळ डाव्या बाजूचे पुढील चाक अचानक निखळले व पुढे गेले.

 

त्यावेळी प्रवाशांच्या वजनाने बस तिथेच रस्त्यात रुतली. बसचे चाक निखळल्याचे प्रवाशांना व परिसरातील नागरिकांना समजताच मोठा गोंधळ उडाला. बसचे चाक बाहेर आल्याचे पाहून अनेकांना धडकीच भरली. उतारावर असताना हे चाक निखळले असते तर मोठा धोका झाला असता.

 

केवळ सुदैवानेच अलीकडेच हा प्रकार झाल्याने अनेकांनी नि:श्‍वास टाकला. बाहेर पडलेले चाक दुचाकीवर आदळल्याने तिचे किरकोळ नुकसान झाले. आठवणी ताज्या ताबूत विसर्जनची मिरवणूक सुरू असताना पापाची तिकटीहून गंगावेशकडे निघालेल्या केएमटी बसचा ब्रेकफेल झाल्याने मिरवणुकीतील कार्यकर्त्यांना चिरडल्याची घटना २०१७ मध्ये झाली होती. त्याच परिसरात झालेल्या आजच्या प्रकाराने त्या घटनेची आठवण ताजी झाली.

 

गर्दी, महामार्गावर धोका मोठा

बसच्या फेऱ्या कमी असल्याने सकाळी व सायंकाळी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये असतात. त्यावर चालक-वाहकही काही करू शकत नाहीत. बोंद्रेनगर ते कागल ही बस मध्यवस्तीतील प्रचंड गर्दी असलेल्या भागातून जाते. तसेच महामार्गावरूनही धावते. या दोन्ही ठिकाणी जर ही घटना झाली असती तर प्रवासी, चालक-वाहक, रस्त्यावरील नागरिकांच्या जीवावर बेतले असते. त्यासाठी केएमटी प्रशासनाकडून आवश्‍यक काळजी घेण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -