Homeइचलकरंजीइचलकरंजी: तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा ७ जण ताब्यात : दिड लाखाचा...

इचलकरंजी: तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा ७ जण ताब्यात : दिड लाखाचा मुद्देमाल जप्त

येथील जवाहरनगर परिसरातील राजेंद्र तळकर यांच्या घराच्या टेरेसवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ७ जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम, मोवाईल व दुचाकी असा १ लाख ६६ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सद्दाम सनदी यांनी फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जवाहरनगर बेधील स्वामी मळ्यात राहणाऱ्या राजेंद्र तळकर यांच्या घराच्या टेरेसवर तीनपानी जुगार सुरु असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली, त्यानुसार पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी प्रविण रामचंद्र गिरीबुवा (वय ४१ रा. स्वामी मळा), शकील महंमदहुसेन मुल्ला (वय ४० रा. साईनाथ मंदिर), सागर शंकर काळे (वय ३२ रा. साईनाथ मंदिर), राजेंद्र विलास तळकर (वय ३७ रा. स्वामी मळा), रमेश नुराप्पा काळे (वय ४० रा. म्हसोबा चौक), कृष्णात आनंदा मोळे (वय ३४ रा. स्वामी मळा) व यशवंत सुभाष मुतालिक (चय ३६ रा. संग्राम चौक) हे सर्वजण जुगार खेळताना मिळून आले.

पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन ७६३० रुपयांची रोकड, ६४ हजाराचे ६ मोबाईल, ४० हजाराची मोपेड व ३० हजाराची मोटारसायकल असा १ लाख ६६ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -