लग्नानंतर पाठकबाईंनी शेअर केला खास फोटो, म्हणाली – ‘मला माझ्या लग्नात…’

ताजी बातमी ऑनलाईन टीम

‘तुझ्यात जीव रंगाला’ या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहचलेले आणि सर्वांच्या मनात स्थान मिळवलेले पाठकबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर आणि राणादा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी हे मालिकेनंतर आता खऱ्या आयुष्यात एकमेकांचे आयुष्यभराचे जोडीदार झाले आहेत. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे 2 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. त्यांच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. लग्नातील दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला.अक्षया आणि हार्दिक यांचा विवाहसोहळा पुण्यामध्ये अतिशय पारंपरीक पद्धतीने पार पडला. लग्नात दोघांनीही पारंपरीक लूक केला होता. त्यांच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतले. दोघेही लग्नात खूपच सुंदर आणि आनंदी दिसत होते. अजूनही त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असून त्यांच्यावर दोघांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लग्नानंतर अक्षयाने लग्नसोहळ्यातील खास फोटो चाहत्यांसोबत शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे.

Join our WhatsApp group