Friday, June 2, 2023
HomeTechnology & gadgetsनवीन रॉयल एनफील्ड क्लासिक 350 या दिवशी होणार लॉन्च,

नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक 350 या दिवशी होणार लॉन्च,रॉयल एनफील्ड प्रेमींसाठी एक चांगली बातमी. एकापेक्षा एक उत्तम बाइक बनवणारी देशातील Royal Enfield कंपनी येत्या 1 सप्टेंबरला एक मोठे सरप्राईज देणार आहे. रॉयल एनफील्ड क्लासिक 350 (New Royal Enfield Classic 350) 27 ऑगस्ट 2021ला लॉन्च होणार होती. मात्र, याला काही दिवसांनी विलंबित झाला आहे. नवीन आरई क्लासिक 350 आता 1 सप्टेंबर 2021 ला लॉन्च होईल. 2021मध्ये क्लासिक 350 आधीच अनेक वेळा पाहायला मिळली आहे आणि अनेक डिटेल्स उघड झाले आहेत. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये या बाईकचे अधिकृत TVC शूटिंग दरम्यान मोटारसायकलबाबची गोष्ट पूर्णपणे उघड झाली.

शक्तिशाली इंजिन आणि प्लॅटफॉर्म
नेक्स्ट जेनरेशन क्लासिक 350 ची स्पर्धा होंडा CB350 आणि जावा 42 सह इतर बाइक्सशी असेल. नवीन क्लासिक 350 च्या इंजिन, पॉवर आणि फीचर्सबद्दल जबरदस्त आहेत. Meteor 350 cruiser प्रमाणे, यात 349cc फ्यूल इंजेक्टेड इंजिन पाहायला मिळेल, जे 20.2bhp पर्यंतची पॉवर निर्माण करेल आणि 27 एनएमपर्यंत अप पिकअप टॉर्क सक्षम असेल. यात 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. ही बाईक कंपनीच्या नवीन ‘जे’ आर्किटेक्चरवर विकसित केली जाईल.

अनेक नवीन सुविधा मिळतील
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, नवीन क्लासिक 350ला नवीन इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ट्रिपर नेव्हिगेशन, क्रोम बेझल्ससह गोलाकार हेडलॅम्प, क्रोम प्लेटेड एक्झॉस्ट, टीअर ड्रॉप शेप्युअल इंधन टाकी, नवीन टेल लॅम्प आणि इंडिकेटर्स, सिंगल आणि ड्युअल चॅनेल एबीएस, फ्रंट आणि रियर डिस्क मिश्रधातूच्या चाकांसह अनेक फीचर्स आहेत. नवीन क्लासिक 350 चे उर्वरित तपशील देखील येत्या काळात उघड केले जातील. तोपर्यंत फक्त पुढील आठवड्याची वाट पहा.

संभाव्य किंमत पाहा
जैसलमेरमध्ये टीव्हीसी जाहिरात शूटिंग दरम्यान आणि नंतर रस्ता चाचणी दरम्यान अनेक वेळा नवीन क्लासिक 350 ची झलक दिसली. असे मानले जाते की ती नवीन रंग पर्यायांसह सादर केली जाईल. Meteor 350 cruiser मल्टी कलर पर्यायासह लॉन्च केली गेलय. नवीन क्लासिक 350 भारतात 1.80 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केली जाऊ शकते आणि त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 2 लाख रुपये असू शकते.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group