Friday, June 2, 2023
Homeमनोरंजनघटस्फोटानंतर समांथा पुन्हा पडली पुन्हा प्रेमात ? ट्विट करत म्हणाली, 'तुझ्यासारखं प्रेम'

घटस्फोटानंतर समांथा पुन्हा पडली पुन्हा प्रेमात ? ट्विट करत म्हणाली, ‘तुझ्यासारखं प्रेम’

घटस्फोटानंतर समांथा पुन्हा पडली पुन्हा प्रेमात ? ट्विट करत म्हणाली, ‘तुझ्यासारखं प्रेम’

साउथस्टार अभनेत्री समांथा रुथ प्रभू ही मागील काही काळापासून अनेक कारणाने चर्चेत असते. सध्या ती तिच्या आगामी ‘शकुंतलम’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कुठलीही कसर सोडतांना दिसत नाही आहे.

ती हैदराबाद आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली आहे. ती चाहत्यांची लाडकी आहे. केवळ साउथच नाही तर तिची हवा जगभर आहे.

नुकतच समांथा तिच्या चाहत्याला ट्विटरवर दिलेल्या उत्तरामुळे चर्चेत आली आहे. त्याच झालं असं की, एका चाहत्याने समांथाला कोणालातरी डेट करण्याची विनंती केली. यावर समांथानं त्याला जे उत्तर दिलं त्यानं सर्वांची मनं जिंकली आहे.

26 मार्च रोजी एका चाहत्याने ट्विटद्वारे समांथाला विनंती करत ट्विट केलं की, ‘ही त्याचा हक्क नाही, कृपया कोणाला तरी डेट कर.’ समांथाही या चाहत्याच्या ट्विटला उत्तर देताना दिसली.

अभिनेत्रीने लिहिले, ‘तुझ्यासारखं माझ्यावर कोण प्रेम करेल.’ यासोबतच अभिनेत्रीने हार्ट इमोजी देखील शेअर केला आहे.

तिच्या या कृतीनं तिनं पुन्हा चाहत्यांची मनं जिंकली आहे. तिचं हे ट्विट सध्या व्हायरल झालं आहे. या ट्विटची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

समांथा रुथ प्रभू ही ‘शाकुंतलम’ या चित्रपटात दिसणार आहे. हा एक पीरियड ड्रामा आहे . या चित्रपटाचे दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे. ‘शंकुतलम’ 14 एप्रिल 2023 रोजी पदर्शित होणार आहे.

समांथाला ‘मायोसिटिस’ नावाचा आजार आहे. काही दिवसांपुर्वीच तिनं पोस्ट शेअर करत याची माहिती दिली होती. त्यानंतर चाहत्यांनी तिची खुप काळजी लागून होती.

त्यानंतर तिनं स्वत:वर खुप मेहनत घेतली. ती आजारपणामुळे ब्रेकवर होती. मात्र, त्यानंतर ती आता जोरदार पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे.

ती शाकुंतलम नंतर ‘खुशी ‘ चित्रपटातही दिसणार आहे. तसेच, तिने तिच्या आगामी वेब सिरीज ‘सिटाडेल’ चे शूटिंग सुरु केले आहे, ज्यामध्ये ती बॉलिवूड स्टार वरुण धवन सोबत दिसणार आहे.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group