Friday, June 2, 2023
Homeक्रीडाIPLच्या पहिल्याच दिवशी या फोटोने जिंकलं मन!

IPLच्या पहिल्याच दिवशी या फोटोने जिंकलं मन!

जगप्रसिद्ध क्रिकेट लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सीजनला आजपासून सुरुवात झाली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा पहिला सामना खेळवण्यात आला.

यासामन्यापूर्वी आयपीएलचा दिमाखदार उदघाटन सोहळा पारपडला असून यात सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंह याने केलेल्या एका कृतीने प्रेक्षकांचं मन जिंकलं. अहमदाबाद येथे चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलचा पहिला सामना खेळवण्यात आला. या सामन्यापूर्वी तब्बल चार वर्षांनी आयपीएलचा उदघाटन सोहळा संपन्न झाला असून यात बॉलिवूड स्टार्सने त्यांच्या परफॉर्मन्सने चारचाँद लावले. यात अरिजित सिंहने आपल्या गाण्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले तर अभिनेत्री रश्मीका मंधाना आणि तमन्ना भाटिया या दोघींची डान्सचा तडखा लावला.

उदघाटन सोहळ्यानंतर चेन्नई आणि गुजरात संघाच्या कर्णधारांना मंचावर आमंत्रित करण्यात आले. यावेळी एम एस धोनी मंचावर येताच सुरांचा बादशाह अरिजित सिंह धोनी समोर नतमस्तक झाला. त्याने धोनीच्या पायांना हात लावून नमस्कार केला. अरिजित सिंहच्या याकृतीने प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासोबतच मन देखील जिंकले.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group