कोण आहे तालिबानचा म्होरक्या मुल्ला बरादर? अफगाणिस्तानच्या भावी राष्ट्राध्यक्षपदासाठी नाव चर्चेत


अफगाणिस्तानमध्ये 1994 साली ज्या चार लोकांनी तालिबानची स्थापना केली त्यापैकी एक नाव म्हणजे मुल्ला अब्दुल गनी बरादर. तो सध्या तालिबानच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख आहे.


तालिबान या दहशतवादी संघटनेनं अफगाणिस्तानवर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केलं असून त्यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन होणार हे आता स्पष्ट झालं आहे. राष्ट्रपती अशरफ घनी यांनी आता सत्तेचं शांततेच्या मार्गाने हस्तांतरण करण्याची तयारी केली असून तालिबानच्या कोणत्या नेत्याकडे सत्तेची कमान जाते याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशात तालिबानचा म्होरक्या मुल्ला अब्दुल घनी बरादार याचं नाव सर्वांत पुढं येत आहे. राष्ट्रपती पदासाठी त्याच्या नावाची लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.




कोण आहे मुल्ला अब्दुल गनी बरादर?
अफगाणिस्तानमध्ये 1994 साली ज्या चार लोकांनी तालिबानची स्थापना केली त्यापैकी एक नाव म्हणजे मुल्ला अब्दुल गनी बरादर. तो सध्या तालिबानच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख आहे. तसेच तालिबानच्या शांती वार्ता पथकाचा प्रमुख सदस्य आहे.



Afghanistan : राष्ट्रपती अशरफ घनी सत्ता सोडणार; तालिबानचा कमांडर मुल्लाह अब्दुल घनी बरादार बनणार राष्ट्राध्यक्ष


मुल्ला बरादर यांने 1980 च्या दशकात सोव्हिएत रशियाच्या सैन्याच्या विरोधात अफगाणिस्तानमध्ये जिहाद पुकारला होता. 1992 साली, रशियन सैन्याच्या माघारीनंतर देशाचे नेतृत्व कोण करणार यावर गृहयुद्ध सुरु झालं. त्यावेळी मुल्ला बरादर यांने आपला नातेवाईक मुल्ला उमर याच्या मदतीने कंदहारमध्ये एक मदरसा स्थापन केला. नंतरच्या काळात 1996 साली तालिबानने अफगाणिस्तानचे सरकार उलथवून आपली सत्ता स्थापन केली.



अटक आणि सुटका
अमेरिकेतील 9/11 च्या घटनेनंतर या प्रदेशातील सगळी समिकरणं बदलली. सन 2001 साली अमेरिका आणि नाटोचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये आले आणि त्यांनी तालिबानला सत्तेतून बाजूला सारलं. त्यावेळी अमेरिकन सैन्याच्या विरोधात मोठं बंड झालं, त्याचं नेतृत्व मुल्ला बरादर याने केलं होतं. सन 2010 साली अमेरिका आणि पाकिस्तानच्या एका संयुक्त कारवाईत मुल्ला बरादर याला कराचीतून अटक करण्यात आली होती.

Leave a Reply

Join our WhatsApp group